Navratri : स्त्री वर्षभरच पुजली पाहिजे

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये कन्येला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले जाते, तिला पुजले जाते
Navratri
Navratri sakal

नागपूर : आदिशक्तीच्या जागराला सोमवारपासून सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली. शक्तीच्या या काळात कन्यापूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ’ने या काळात कन्येच्या उन्नतीचा संपूर्ण प्लान देण्याचे ठरवले आहे. त्यातील एक भाग म्हणून मुलींसाठी दिवा लावण्याचे आवाहन करण्यात आले. पहिल्याच दिवशी सकाळच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. मुलगी देव्यानी हिच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिवा लावताना मिसेस युनिवर्स २०२२ प्रवीणा दाढे.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये कन्येला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले जाते, तिला पुजले जाते. मात्र, इतर वेळी याच कन्येबाबत अनेक नकारात्मक बातम्या समाजाच्या प्रत्येक स्तरातून ऐकायला-वाचायला मिळतात. अनेक मुलींना शिक्षण मिळत नाही. कित्येक निष्पाप जीव अंधश्रद्धेच्या बळी ठरतात. दररोज कितीतरी महिला घरगुती हिंसाचाराला सामोरे जातात. हा सगळा अनिष्ट अंधार दूर होण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’ने हाती घेतलेले ‘एक दिवा कन्येसाठी, तिच्या उज्ज्वल उद्यासाठी’ हे अभियान कौतुकास्पद आहे.

स्त्री’ला खऱ्या अर्थाने सन्मान द्यायचा असेल तर केवळ नऊ दिवस नव्हे तर वर्षभर पुजले पाहिजे. स्त्री नवदुर्गेचे रूप आहे. समाजाच्या विविध स्तरांमध्ये काम करणाऱ्या स्त्रीच्या विविध रूपांमध्ये आपल्याला देवीची रूपे पाहायला मिळू शकतात. घरी माता, पत्नी, आजी, मावशी, काकू, आत्या अशा रूपांमध्ये तिचा सहवास आपल्याला लाभतो.

स्त्री जन्मदात्री आहे. तिच्यामुळे संपूर्ण घर एकत्र बांधले जाते. स्त्रीला कर्तृत्ववान होण्यासाठी बालपणी तसे संस्कार कन्येवर व्हायला पाहिजे. त्याचीच उजळणी ‘सकाळ’ या नऊ दिवसांच्या काळात घेणार आहे. त्यामुळे आपल्या चिमुकलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदवला पाहिजे. भावी पिढीच्या सुरक्षेसाठी मी या अभियानात सहभागी झाले. आपणही यात सहभाग नोंदवून तिच्यासाठी एक दिवा लावायलाच हवा.

-अमृता फडणवीस,गायिका, समाजसेविका, उपाध्यक्ष, ॲक्सिस बँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com