Nagpur Corona update: एकाच दिवशी ७४ कोरोना बळी; ५ हजार ८१३ नव्या बाधितांची नोंद

corona virus
corona virus

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून आता कोरोना बेलगाम झाला आहे. दर दिवसाला एक नव्या उच्चांकाची नोंद होत आहे. दगावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून एकाच दिवशी ७४ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यापुर्वी ७३ जणांचे मृत्यू ८ एप्रिलला झाले होते.

आज नवा मृत्यूचा उच्चांक झाला असून जिल्ह्यात कोरोना बळीची संख्या ६ हजार ३४ झाली आहे. तर दिवसभरात नव्याने ५ हजार ८१३ बाधितांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ३ लाखाचा पल्ला ओलांडला आहे. गृहविलगीकरणात ४७ हजारवर रुग्ण आहेत.

कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्याची स्थिती हाताबाहेर गेली आहे. रुग्णसंख्या वाढत रुग्णालयांत कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खाटा उपलब्ध होत नाही. परिणामी त्यांचे घरीच मृत्यू होत आहेत. परिस्थितीपुढे प्रशासनही आता हतबल झाले. नाईलाजास्तव नागपुरातील रुग्णांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठवण्यात येत आहे.

गुरुवारी मृत्यू झालेल्यामध्ये शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील ३० व जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात २२ हजार ५७५ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी २५.७५ टक्के म्हणजेच ५ हजार ८१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३ हजार ४५८, ग्रामीणचे २हजार ३५० व जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २ हजार ८४९ वर जाऊन पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुक्तांची टक्केवारी ७७.६० पर्यंत आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com