
नागपूर : मे महिन्याच्या पूर्वार्धात ऊन-पावसाचा खेळ चालल्यानंतर उत्तरार्धातही कमी अधिक प्रमाणात असेच वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. आगामी काही दिवसात बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होणार असल्याने नवतपातही अवकाळीचे सावट अपेक्षित आहे.