एम्स'च्या पदभरतीत आरक्षणाला धक्का?

aiims
aiims

नागपूर : केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला 27 टक्के, एससी समाजाला 15 टक्के तर एसटी समाजाला 7.5 टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या 20 पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जाती आणि जमातीसह भटक्‍यांच्या आरक्षणालाच धक्का देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूरच्या मिहान परिसरात एम्स सुरू झाले आहे. येथील बाह्यरुग्ण विभागापासून तर अनेक विभागांमध्ये उपचार यंत्रणा उभारण्यात आली. पदभरती सुरू झाली. मात्र पदभरतीची जाहिरात प्रकाशित करताना यात एकही पद अनुसूचित जाती,जमाती आणि भटक्‍यांसाठी राखीव ठेवण्यात आले नाही. यामुळे आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या संवर्गात असंतोष पसरला आहे. 17 फेब्रुवारी 2020 रोजी एम्ससाठी आवश्‍यक असलेल्या जागांची जाहिरात काढली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती, जमाती, भटक्‍यांसह इतर मागासवर्गीयांसाठी नोकरीविषयक जे घटनात्मक आरक्षण ठेवले त्याला मात्र साफ डावलले. "एम्स'च्या जाहिरातीनुसार "मेडिकल ऑन्कोलॉजी' विषयासाठी प्राध्यापकांची जागा खुल्या वर्गासाठी असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद आहे. याशिवाय "फॉरेन्सिक मेडिसनी', फॉर्मेकालॉजी, मायक्रोबायोलॉजी, "पॅथालॉजी', रेडिओडायग्नोसिस, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, सर्जिकल ऑन्कोलॉजी, युरोलॉजी, बर्न ऍण्ड प्लास्टिक सर्जरी, जनरल सर्जरी इत्यादी विद्याशाखेसाठी सहयोगी प्राध्यापक, आणि सहाय्यक प्राध्यापक असे मिळून 20 पदे निर्माण करण्यात आली होती. परंतु अनुसूचित जाती (एससी) अनुसुचित जमाती (एसटी), भटक्‍या जमाती (एनटी) साठी एकही पद राखीव ठेवले नाही. इतर मागासवर्गीय (ओबीसी) 4 पदे आरक्षित केली आहे. समाजाला घटनेने बहाल केलेल्या पदभरतीच्या आरक्षणापासून दूर ठेवले आहे, असे आरोप करीत आरक्षित संवर्गाचा विचार करून नव्याने जाहिरात प्रकाशित करावी अशी मागणी अतुल खोब्रागडे यांनी केली आहे.

आरक्षणाच्या धोरणाला बगल नाही
"एम्स'च्या पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या धोरणाला बगल दिलेली नाही. प्रत्येक विभागात बिंदु नामावलीनुसार आरक्षित पदे भरण्यात येत आहेत. नियमानुसार एससी, एसटी, ओबीसीं तसेच एनटीसहित सर्वच संवर्गाचे आरक्षण टप्प्या-टप्प्याने पुर्ण करण्यात येईल.
-डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स, नागपूर.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com