दुकानदारांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका

कार्यालयाला भेटीची पूर्वकल्पना देणे बंधनकारक; त्रस्त दुकानदारांनी केल्या तक्रारी
Department of Legal Metrology, Maharashtra
Department of Legal Metrology, MaharashtraSakal

नागपूर - वजनकाटा तपासणीसाठी कधीही धडकून दुकानदारांना त्रास देणाऱ्या वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्य नियंत्रकांनी चांगलाच दणका दिला आहे. आता दुकान, आस्थापनांना भेट देण्यापूर्वी सहायक नियंत्रकांना कार्यालयात नोंद करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर कार्यवाहीचा अहवालही त्याच दिवशी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे दुकानदारांकडून चिरीमिरीची सवय जडलेल्यांना चाप बसणार आहे. दुकानदारांनाही विभागीय कार्यालयात फोन करून अधिकाऱ्यांनी भेटीपूर्वी कार्यालयाला कार्यवाहीची माहिती दिली की नाही, याबाबत विचारणा करता येणार आहे.

विभागातील दुकानदारांना वैध मापन विभागाचे विभागीय सह नियंत्रकांकडून होणाऱ्या त्रासाबाबात नियंत्रक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्य नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सह नियंत्रकांना आस्थापनांना भेट देण्यापूर्वी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सहनियंत्रक कार्यालयास देणे बंधनकारक केले. डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी याबाबत स्पष्ट आदेश काढले आहे.

विभागीय सहनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी भेटीचा उद्देश आणि माहिती सहनियंत्रक कार्यालयास आगाऊ देण्याचे निर्देश दुकानदारांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २०१९ मध्ये दिले आहेत. तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन मालकांना नाहक त्रास देत असल्याची बाब उघडकीस आली. याबाबत अनेक तक्रारी राज्य नियंत्रकांकडे आल्या. या तक्रारींची दखल घेत डॉ. सिंघल यांनी नाहक त्रास देण्याच्या हेतूने भेट देणाऱ्या यंत्रणेतील सह नियंत्रकांना मुख्यालयास आगाऊ माहिती देण्याचे बंधनकारक केले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २०१९ मध्ये दिले आहेत. तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन मालकांना नाहक त्रास देत असल्याची बाब उघडकीस आली. याबाबत अनेक तक्रारी राज्य नियंत्रकांकडे आल्या. या तक्रारींची दखल घेत डॉ. सिंघल यांनी नाहक त्रास देण्याच्या हेतूने भेट देणाऱ्या यंत्रणेतील सह नियंत्रकांना मुख्यालयास आगाऊ माहिती देण्याचे बंधनकारक केले.

कार्यवाहीबाबत दुकानदार करतील खातरजमा

सहनियंत्रकांनी आस्थापना, दुकानात भेटीची आगाऊ माहिती नियंत्रक कार्यालयात दिली की नाही, याबाबात खातरजमा करण्यासाठी राज्यातील आस्थापना, दुकानदार व्यापारी यांनी ०२२-२२६२१९६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नियंत्रक वैध मापक शास्त्र डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.

नागपूर विभागासाठी या क्रमांकावर करा संपर्क

राज्यातील सर्वच विभागातील आस्थापना, दुकानमालकांसाठी नियंत्रक डॉ. सिंघल यांनी दूरध्वनी क्रमांक जाहीर केले. नागपूर विभागात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यातील दुकानदारांना ०७१२- २५४०२९२ या क्रमांकावर संपर्क करून अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबत विचारणा करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com