आता महावितरण येणार तुमच्या गावी; एक गाव-एक दिवस उपक्रमाचा शुभारंभ; गावात जाऊन देणार सेवा 

One day One Village scheme introduced by MSEB in Nagpur
One day One Village scheme introduced by MSEB in Nagpur

नागपूर ः महावितरणने नागपूर जिल्ह्यात एक गाव -एक दिवस उपक्रम सुरू केला आहे. सोमवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्या अंतर्गत प्रत्यक्ष गावात जाऊन वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, वीजबिलाची दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्रीचा या मोहिमेत समावेश आहे.

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, कामठी, सावनेर तालुक्यातील गावांत एक गाव - एक दिवस हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यातील गावांमध्ये लवकरच मोहीम राबविली जाणार आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थांसह थेट संवाद साधून मोबाईल ॲप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करण्यात येत आहे. 

सोबतच वीज तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम राबविली जाणार आहे. 

महावितरणच्या सावनेर विभागातील गंडरी, खापा बडेगाव, मोहपा, धापेवाडा, निंबा, कोथुर्णा, कोहळी, घोराड,चणकापूर, वाकी, सिंदेवाणी उमरी, उप्परवाही , मौदा विभागात मारोडी, आमडी , घोरपड, टेकाडी , दिघोरी, नेरी, सिवनी, निलज, काटोल विभागातील जामगाव, खैरगाव, लोहारीसावंगा, थुगावदेव, भारसिंगी, येनवा, इसापूर, धवलपूर, वंडली, खानगाव, लाडगाव, मसोद, तीनखेडा, बेलोना, येणिकोनी माणिकवाडा, उमरेड विभागातील मांजरी, खेड, टाकळी, वाढेगाव, लोणारा, चारगाव, चिखलापूर, सिरसी, चिमणाझारी, बेला, कळमना या गावात ही मोहिल राबविली जाईल.

गतवर्षी मिळाला उस्त्फूर्त प्रतिसाद

गतवर्षीही ही मोहीम राबविली गेली. त्यातंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ४०९ कामे करण्यात आली होती. सोबतच वीजबिल व वीजमीटर संदर्भातील ६५४ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com