esakal | महापालिकेसोबतच फडणवीस जिल्हा परिषदेतही सक्रीय, सदस्यांना दिला आक्रमक होण्याचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

फडणवीस जिल्हा परिषदेतही सक्रीय, सदस्यांना दिला आक्रमक होण्याचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेसोबतच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी नागपूर जिल्हा परिषदेतही (nagpur zp) लक्ष घालणे सुरू केले आहे. त्यांनी जि.प. सदस्यांची भेट घेऊन त्यांनी सर्वांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेतल्या. सोबतच आक्रमक होण्याचा सल्ला दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या घडामोडी सुरू झाल्याने तो राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे मानले जात आहे. (opposition leader devendra fadnavis active in zp circle of nagpur)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

भाजपकडे महापालिकेत १०८ नगरसेवकांचे पाठबळ असले तरी जिल्हा परिषदेत सत्ता नाही. त्यातच ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व गेल्याने विरोधी पक्षनेताही नाही. माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान बावनकुळे यांचे कट्टर समर्थक आहेत. आरक्षणात त्यांचाही बळी गेला आहे. त्यांच्यानंतर भाजपकडे दुसरा आक्रमक चेहरा नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी काहींनी प्रयत्न केला तर त्याला इतरांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा ग्रामीण भागातील राजकारणावर परिणाम दिसू लागला आहे. ग्रामीण भागात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेतील महत्‍त्वाचे निर्णय त्यांच्याच सहमतीने घेण्यात येतात. विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दाही त्यांच्याकडे पेंडिंग आहे. तो निकाली काढला जात नसल्याने नाराजी आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे अनेक मुद्दे असतानाही भाजपचे सदस्य ते हाताळण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे फडणवीस यांची भेट घेऊन अनेक सदस्यांनी नेमके काय करायचे याबाबत चर्चा केली.

जिल्हा परिषद सदस्यांना वाऱ्यावर सोडल्यास विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे. सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. आमदार गिरीश व्यास बिनविरोध निवडून आले होते. आता तशी राजकीय परिस्थिती राहिली नाही. ही जागा कायम राखण्यासाठी फडणवीस यांनी ग्रामीण भागाची सूत्रे हाती घेतले असल्याची चर्चा आहे. फडणवीस जिल्हा परिषदेत सक्रिय झाल्यास एका दगडात अनेक पक्षी घायाळ करू शकतात.