‘जयभीम’सह विविध चित्रपटांची मेजवानी; ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Orange City International Film Festival

‘जयभीम’सह विविध चित्रपटांची मेजवानी; ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

नागपूर : नागपूरकरांना १२ व १३ मार्चला अनेक विक्रमासह ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला ‘जयभीम’ चित्रपटासह मराठी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘सेमखोर’ या चित्रपटाने सुरवात होणार आहे.

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ आणि १३ मार्चला मेडिकल चौकातील व्हीआर सिनेपोलीस चित्रपटगृहात ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १२ मार्चला सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री डॉ . नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी विमला आर. मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ कलाकार व समीक्षक समर नखाते, कलरब्लाईन्ड चित्रपटाचे दिग्दर्शक धोंडीबा बाळू करांडे यांची उपस्थिती राहणार आहे. ‘जयंती’ चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नलावडे आणि चित्रपटाची चमू देखील यावेळी उपस्थित राहील.

गानकोकिळा लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येईल. चित्रपट आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या पंडित भीमसेन जोशी, प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी आणि सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. महोत्सवात कोविड विषयक नियमांचे पालन करण्यात येणार असून लसीच्या दोन्ही मात्रा आवश्यक आहे. झाशी राणी चौक येथील विदर्भ साहित्य संघात दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्रपट महोत्सवासाठी नावे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे फाउंडेशनचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास मानेकर यांनी सांगितले.

Web Title: Orange City International Film Festival Jay Bhim Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
go to top