esakal | नागपुरात हातभट्टीची सव्वाचारशे लिटर दारू जप्त; आठ बार मालकांवर गुन्हे दाखल

बोलून बातमी शोधा

crime
नागपुरात हातभट्टीची सव्वाचारशे लिटर दारू जप्त; आठ बार मालकांवर गुन्हे दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः लॉकडाउनमध्ये दारुची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने हातभट्‍टी दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. जिल्ह्यात मोठ्‍या प्रमाणात अवैधरित्या हातभट्‍टीची दारू विकल्या जात आहे. ही दारू विक्री करणाऱ्या आठ आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. त्यांच्याकडून ४१८ लिटरर दारू जप्त केली तसेच आठ बार मालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा: कन्हान रुग्ण मृत्यूप्रकरण: आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत, जबाबदारी घेणार कोण? संतप्त कुटुंबीयांचा प्रश्न

पो.स्टे. कुही , गिट्टीखदान अंतर्गत दुचाकी वाहनाने अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार असून पो.स्टे. नंदनवन अंतर्गत विक्री होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त पाळत ठेवून व धाड टाकून एकूण १२ गुन्हे दाखल केले. सहा दुचाकी वाहनांसह एकूण ४१८ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात केली. रमेश देशमुख, सुलतान शेख, इमरान खान, झोली पवार, लता बोर्गे, विलास वानखेडे, सतीश तवाले, पवन बोकडे यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

मौर्य बार - बोकारा, सनराईज बार -दहेगाव रंगारी, स्मृती बार- वायगाव घोटुरली, सत्कार बार- वाडी, राजेश्री बार -कळमेशवर, ब्रम्हा बार- मानेवाडा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई उपायुक्त मोहन वर्दे व अधिक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सुभाष खरे, अशोक शितोळे , जितेंद्र पाटील, राम सेंगर, दुय्यम निरीक्षक, शैलेश अजमिरे, प्रवीण मोहतकर , मुकुंद चिटमटवार , बाळू भगत, नरेंद्र बोलधने यांच्या पथकाने केली.

संपादन - अथर्व महांकाळ