संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आपण कमी पडलो ; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आपण कमी पडलो ; नितीन गडकरी

नागपूर : संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. ती अनेक भाषांची गंगोत्री आहे. ही भाषा लोकाभिमुख भाषा बनावी. तसेच जोपर्यंत ही भाषा आधुनिक ज्ञानाची होणार नाही, तोपर्यंत तिचा प्रचार आणि प्रसार होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे ‘पंकजश्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. पंकज चांदे, कुलसचिव रामचंद्र जोशी, प्रा. कविता होले, प्रा. डॉ. नंदा पुरी व अन्य उपस्थित होते. संस्कृत भाषेमध्ये आपल्यापेक्षा अधिक संशोधन व अध्ययन जर्मनीमध्ये सुरू असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, आगामी काळात संस्कृतबद्दलचे ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे ही भारतीय समाजाची आवश्यकता आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे या विद्यापीठासाठी बहुमूल्य योगदान आहे. या विद्यापीठाचा प्रारंभीचा काळ कठीण होता. डॉ. पंकज चांदे हे संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर व नंतरच्या कुलगुरुंनीही या विद्यापीठाला लोकाभिमुख बनविण्यासाठी चांगले योगदान दिले. संस्कृत भाषेचे महत्त्व भारतीय समाजाला समजावण्यात आपण कमी पडलो, अशी खंतही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.

Web Title: Pankajashree Book Publication Kavikulguru Kalidas Sanskrit University Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top