esakal | १५ वर्षांपूर्वी जन्मलेल्यांना करता येणार नाव नोंदणी, पण ही शेवटची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur NMC

१५ वर्षांपूर्वी जन्मलेल्यांना करता येणार नाव नोंदणी, पण ही शेवटची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंधरा वर्षानंतर मनपात बाळाच्या नावाची नोंद घेण्यात कायदेशीर अडचण होती. यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देऊनही अनेकांनी नावाची नोंद केली नसल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. शासनाने आता पुन्हा २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. विशेष म्हणजे ही शेवटची संधी असल्याचेही नमुद केले. त्यामुळे आता महापालिकेत (nagpur municipal corporation) मागील वर्षापासून बंद असलेली नावाची नोंदणी करता येणार आहे. (people born before 15 years have last chance to enroll their name in municipal corporation)

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

जन्म-मृत्यू नोंदणी नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बाळाचे नाव नोंद करण्याची तरतूद आहे. त्यामुळे एक जानेवारी २००० पूर्वी जन्म झालेल्या बाळाचे नाव महापालिकेत नोंदवले जात नव्हते. तसेच जन्म दाखल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी केली जात नव्हती. दाखल्यावर स्त्री किंवा पुरुष अशी नोंद होत होती. परिणामी शासकीय कार्यालयांत जन्म दाखला दिल्यानंतर नाव नसल्याने अडचण येत होती. पासपोर्ट काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने २००५ मध्ये जन्माच्या पंधरा वर्षानंतरही नाव नोंदणीची संधी दिली होती. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी जन्मलेल्यांना नाव नोंदणीसह जन्म दाखला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने २००७ पर्यंतच ही सुविधा दिली होती. त्यानंतर ही सुविधा बंद केली. परंतु, शासकीय नोकरीत लागल्याने काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. नंतर शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी तसेच पासपोर्ट आदी काढण्यासाठी जन्म दाखल्याची गरज पडल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्यात जन्म दाखल्यावर नावाशिवाय कुणीही राहू नये, या हेतूने राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १२ मे रोजी आदेश काढून २७ एप्रिल २०२६ पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे नमुद केले. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करण्याचे आदेश महापालिकांना दिले.

नाव नोंदणीसाठी आतापर्यंत मिळालेली मुदतवाढ

  • २० ऑक्टोबर २००५ ते २५ ऑक्टोबर २००७

  • १ जानेवारी २०१३ ते १३ डिसेंबर २०१४

  • १५ मे २०१५ ते १४ मे २०२०

राज्य सरकारचे याबाबत आदेश निघाल्याचे कळले. परंतु महापालिकेला अधिकृतरित्या आदेश प्राप्त झाले नाहीत. महापालिकेला अधिकृतरित्या आदेश मिळाल्यानंतर १५ वर्षांपूर्वी जन्मलेल्याच्या नावांची नोंदणी करण्यात येईल.
-डॉ. रंजना लाडे, मनपा सचिव व उपायुक्त.
loading image