"सत्तेसाठी काँग्रेस लाचार": प्रवीण दरेकरांची नागपुरातील पत्रकार परिषदेत टीका 

Pravin Darekar criticized Congress in Nagpur
Pravin Darekar criticized Congress in Nagpur

नागपूर ः वर्षभराच्या कार्यकाळात महाआघाडी सरकारने  शेतकऱ्यांना मदत केली नाही, आश्वासन देऊन मोफत वीज दिली नाही, शाळा सुरू करायच्या की नाही हे ठरवू शकले नाही  ते सरकार पदवीधरांना काय न्याय देणार असा सवाल  विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. 

भाजपतर्फे पदवीधरांना निश्चित कालावधीत नोकरी देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला जाईल  तसेच ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना बँकेमर्फत अर्थपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी ते नागपूरला आले होते. 

ते म्हणाले जोशी यांच्या कार्याविषयी वेगळे सांगायची गरज नाही. महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विकास कामे  तसेच नागपूर सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून त्यांच्या नेतृत्वाची क्षमता सर्वांनीच बघितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आणि विद्यमान महाआघाडीचा वर्षभराचा निष्क्रिय कार्यकाळ बघता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 

ही निवडणूक तुम्ही विकासासोबत आहात की नाही हे ठरवणारी आहे,असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार मिलिंद माने, रिपाईचे राजन वाघमारे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

काँग्रेस लाचार

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किंमत देत नाही. शिवसेनेचा मंत्री असल्याने परिवहन विभागाला हजार कोटींचे पॅकेज दिले मात्र ऊर्जा खाते काँग्रेसकडे असल्याने   शंभर युनिटपर्यंत वीज माफीचा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र सत्तेत राहायचे असल्याने  काँग्रेस लाचार झाली आहे.

राष्ट्रवादी लाभार्थी 

महाआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी आहे. सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याचकडे आहेत. निर्णयसुद्धा अजित पवार हेच घेतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल असे ठासून सांगितल्या जात आहे. मात्र महाघाडीत अंतर्गत विसंवाद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे सरकार केव्हाही कोसळू शकते, असेही दरेकर यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com