प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे यांची महाज्योतीवर निवड

Prcharya babanrao taywade and professor Divakar game selected at Mahajyoti
Prcharya babanrao taywade and professor Divakar game selected at Mahajyoti

नागपूर : ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या संचालक मंडळावर शासकीय व अशासकीय संदस्‍यांच्या नियुक्ती शासनाने केली असून नागपुरातील ओबीसी विचारवंत प्राचार्य बबनराव तायवाडे आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ता झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

महाज्योतीचे सदस्य सचिव म्हणून व्यवस्थापकीय संचालक असतात. तर शासकीय सदस्यांमध्ये प्रधान सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त , पुणे येथील शिक्षण आयुक्त या संस्थेचे सदस्य असतात. तर अशासकीय सदस्य म्हणून प्राचार्य तायवाडे आणि प्रा. गमे यांची निवड झाली आहे. 

महाज्योती कार्यान्वित झाली असून ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना या संस्थेअंतर्गत दिल्लीत जाऊन यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने कठीण परिस्थितीत दिल्लीत राहून तयारी करावी लागत आहे. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाठी सवलतीच्या योजना सुरू करता याव्या म्हणून महाज्योती स्थापन करण्यात आले. 

या संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या संस्थेवर उच्च शिक्षितांची नियुक्ती झाल्यामुळे प्रत्यक्ष शैक्षणिक चळवळीतील विचारवंतांची नियुक्ती झाल्यामुळे ओबीसांना याचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती मिळू शकेल

महाज्योतीमुळे राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील एक हजार विद्यार्थ्यांना दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकेल. उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग, एसएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी महाज्योती निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाज्योतीचा लाभ होईल.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com