Manohar Mhaisalkar : म्हैसाळकरांची ती स्वाक्षरी ठरली शेवटची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manohar Mhaisalkar

Manohar Mhaisalkar : म्हैसाळकरांची ती स्वाक्षरी ठरली शेवटची

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, कुशल संघटक मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. वि. सा. संघाच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट सांभाळत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी सरस्वतीची सेवा केली. दोन दिवसांपूर्वीच (बुधवारी) अखिल भारतीय मराठी महामंडळाला पाठविलेल्या पत्रावर त्यांनी स्वत: स्वाक्षरी केली होती. दुर्दैवाने ती त्यांची अखेरची स्वाक्षरी ठरली.

विदर्भ साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक संस्थेप्रमाणे वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे नाव नियमाप्रमाणे वि. सा. संघातर्फेही अंतिम करण्यात आले. याबाबत महामंडळासोबत वि. सा. संघाने केलेल्या पत्रव्यवहारात मनोहर म्हैसाळकरांनी स्वत: जातीने लक्ष दिले. बुधवारी या नावांसह तयार केलेले पत्रावर म्हैसाळकरांनी स्वत: त्यावर सही केली होती आणि त्यानंतरच ते पत्र महामंडळाला पाठविण्यात आले.

यातून त्यांची साहित्याप्रती, विशेषत: विदर्भ साहित्य संघाप्रती म्हैसाळकरांची ती स्वाक्षरी ठरली शेवटचीअसलेली आस्था नव्याने अधोरेखित होते. तसेच, विदर्भ साहित्य संघ शताब्दी वर्ष साजरे करीतअसताना ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे विदर्भ साहित्य संघाच्या पुढाकाराने विदर्भातच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार, साहित्य महामंडळाला आमंत्रणाचे पत्र पाठविण्यात आले. घटक संस्थेचे निमंत्रण आणि शताब्दी वर्ष असल्याने नियमाप्रमाणे साहित्य मंडळाने वि. सा. संघाच्या आमंत्रणाला प्राधान्य दिले आणि संमेलनासाठी वर्धेचे स्थळ घोषित करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनाबाबत देखील ते अखेरपर्यंत पाठपुरावा करीत होते. अशातच, बुधवारी त्यांनी या पत्रावर सही केली अन्‌ दुर्दैवाने गुरुवारी त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची वेळ आली.

दुर्दैवी योगायोग

मनोहर म्हैसाळकरांनी विदर्भ साहित्य संघात अनेक पदे भूषविली. विशेष म्हणजे, याच वर्षी विदर्भ साहित्य संघामध्ये सदस्यत्वाची त्यांनी पन्नास वर्षे पुर्ण केली होती. तर, १ ऑगस्टला त्यांनी नव्वद पार केले. योगायोग म्हणजे विदर्भ साहित्य संघ सध्या शताब्दी वर्ष साजरे करत आहे. अशात, दुर्दैवाने त्यांच्या निधनाची बातमी शुक्रवारी सायंकाळी साहित्य वर्तुळात धडकली अन्‌ साऱ्यांनाच धक्का बसला.