esakal | ३ ते १५ लाख डिपॉझिट केल्यानंतर रुग्णालयात प्रवेश, संदीप जोशींनी खासगी रुग्णालयाला दिला इशारा

बोलून बातमी शोधा

sandeep joshi

३ ते १५ लाख डिपॉझिट केल्यानंतर रुग्णालयात प्रवेश, संदीप जोशींनी खासगी रुग्णालयाला दिला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णांची लूटमार करणाऱ्या खासगी रुग्णालयांनी हा प्रकार थांबवावा, असा इशारा माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. याकरिता ते रोज महापालिकेच्या मुख्यालयात बसणार असून स्वतः बिलांची पडताळणी करणार आहेत.

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक

कोविड रुग्णांना भरती करण्यापूर्वीच तीन ते पंधरा लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगण्यात येते. त्याशिवाय रुग्णाला दाखलच करून घेतले जात नाही. त्याशिवाय बिल वेगळे घेतले जात आहे. तीन दिवसांचे पावणेतीन लाख, चार दिवसांचे साडेतीन लाख रुपये आकारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री वर्धमाननगर येथील खासगी रुग्णालयाने एका पत्रकाराकडून तब्बल तीन लाख रुपये आधीच घेतले. डिपॉझिट भरल्याशिवाय दाखल करून घेण्यास नकार दिला. नाइलाजाने त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात्री पैशाची जुळवाजुळव करावी लागली.

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार काही डॉक्टर्स व रुग्णालये करीत आहेत. स्वच्छ असोसिएशन, सिटीझन फोरम, कॅग, युवा मोर्चा याशिवाय हे याकरिता आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. याकरिता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे; अन्यथा याचा फटका भविष्यात तुम्हा आम्हालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संदीप जोशी यांनी म्हटले आहे. रुग्णालयाने लूटमार केली असल्यास पीडित रुग्णांनी आनंद ९८२२२०४ ६७७, अमेय ९५६१०९८०५२, शौनक ७४४७७ ८६१०५, मनमित ७७४४०१८७८५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

ऑडिटर मॅनेज

बिलांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला ऑडिटर दिलेला आहे. त्यांनाही डॉक्टरांनी सेट केले आहे. ८० टक्के शासकीय दराने आणि २० टक्के खासगी दराने बिल आकारण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र, त्याचे उलट केले जात आहे. एखाद्या नेत्याचा फोन आल्यास पाच-दहा हजार रुपये कमी करून रुग्णांची बोळवण केली जात आहे.