प्राध्यापकानं केलं तब्बल १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण; द्वेषभावनेतून अंतर्गत गुण कमी दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Professor failed 105 students in Nagpur
Professor failed 105 students in Nagpur

नागपूर : कोरोनामुळे परीक्षा घेणे अशक्य झाल्याने अंतिम वर्ष वगळता इतर सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला होता. असे असतानाही डॉ. हरीभाऊ आदमने कला, वाणिज्य महाविद्यालयातील बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात प्राध्यापक डॉ. मिलींद साठे यांनी अंतर्गत गुणदान कमी गुण देत तब्बल १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर आंदोलन करीत, कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक कार्य पूर्ण केले आहे. शिवाय कोरोनामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालय बंद असल्याने तासिका बंद होत्या. शासनाच्या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना ढील वर्गात प्रवेश दिला जाणार होता. हे करताना त्यांचा मागील वर्षाचा निकाल व वार्षिक कामगिरीचा आधारे मूल्यांकन करावे अशा सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला असे अपेक्षित होते. 

मात्र, महाविद्यालयात निकालासाठी गेले असता त्यांना मराठी विषयामध्ये अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे दिसून आले. यावर विद्यार्थ्यांनी विषयाचे प्राध्यापक डॉ. मिलींद साठे यांची भेट घेतली असता त्यांनी तुमची एवढेच गुण घेण्याची पात्रता नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रथम सत्राचे ८० तर द्वितीय सत्राचे २५ विद्यार्थी आहेत. 

शासनाने पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला असतानाही केवळ सुड भावनेतून डॉ. साठे यांनी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याने या विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यापीठाने डॉ. साठे यांच्यावर कारवाई करून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देत उत्तीर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

डॉ. साठेंना याआधीही ठरवले होते दोषी

डॉ. मिलींद साठे यांनी मागील वर्षीही १२५ विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देता अनुत्तीर्ण केल्याची तक्रार होती. त्यानंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीपुढे पाठवण्यात आले होते. यावर डॉ. साठे यांना समितीने दोषी ठरवत विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतर्गत परीक्षेचे गुण देण्यात यावे अशी शिफारस समितीने केली होती. त्यानंतरही पुन्हा डॉ. साठे यांनी यंदाही विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देता अनुत्तीर्ण करण्याचा तोच प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com