
नागपूरचे रघुजी राजे भोसले यांच्या लंडनमधील ऐतिहासिक तलवारीचा परस्पर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती समेर येत आहे. रघुजी भोसले यांच्या २१ वर्षांच्या पराक्रमी कारकिर्दीची साक्षीदार असलेली ही तलवार आहे. दुधारी असणारी तलवार आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लिलावात विकण्यात येणार असल्याचं समजताच खळबळ उडालीय. रघुजीराजेंच्या वंशजांनी ही तलवार परत मिळावी अशी मागणी सरकारकडे केलीय.