कुसुंबी शिवारातील जुगारावर छापा

पोलिसांनी नोंदविला १८ जुगारूंवर गुन्हा ; ८९ लाखांचा ऐवज जप्त
Crime News
Crime Newsesakal

नागपूर - कुही पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या कुसुंबी शिवारा साईच्छा फॉर्म हाऊसवर छापा टाकून १८ जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांच्याकडून ८९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जुगारूंमध्ये नागपूर शहरातील अनेकांची नावे असून गेल्या अनेक महिन्यांपासून येथे जुगार सुरू असल्याची माहिती आहे. शहराजवळीत अनेक फॉर्म हाऊसवर अवैध धंदे सुरू आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

कुही पोलिस ठाणे हद्दीतील कुसुंबी शेत शिवारातील चंद्रकांत पारधी यांचे साईच्छा नावाचे फार्म हाउस आहे. यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून जुगार सुरू असल्याची च४चा आहे. यात लाखोंचा जुगार होत असल्याने नागपूर शहरातील अनेक आंबटशौकीन त्या ठिकाणी चारचाकी वाहनाने जातात आणि लाखोंचा जुगार खेळतात. हा प्रकार सतत सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाला गुप्त माहितीच्या आधारे मिळाली. त्यामुळे नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशाने जुगार अड्यावर छापा घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून कुसुंबी शेत शिवारातील साईच्छा फार्म हाउस वर छापा टाकला. यात एकूण १८ जुगारू जुगार खेळताना आढळले. यात आशीष धनराज मोटघरे, (रा. नरसाळा नागपूर), बादल गोविंदराव बोरकर, (रा. गाडगे नगर, नागपूर), सुशिल मनोहर निमजे, (रा.मित्र विहार नगर, नागपूर), अमोल रमेश उके, (रा. सिरसपेठ, नागपूर), योगेश शांताराम पौनीकर, (रा. खापरखेडा), साहेब नागेंद्र शाह, (रा. कुही), राजेश साधू नाईक, (रा. बहादुरा नागपूर), ८) सुनील काशिनाथ नेरकर, (रा. विहिरगाव), आशिष अरविंद कुकडे, (रा. नरसाळा नागपूर), विनोद नामदेव गावंडे, (रा. विहिरगाव नागपूर), लोकेश बाबूराव गावंडे, (रा. विहिरगाव नागपूर), आशिष रमेश वरखडे, (रा. सिरसपेठ), राम धनराज नांदुरकर, (रा. बहादुरा नागपूर), शंकर रमेश उईके, (रा. बहादुरा नागपूर), सुनील कवडू झाडे, (रा. दिघोरी नागपूर), नामदेव माणिक राऊत, (रा. नरसाळा नागपूर), नंदकिशोर बाबा सालोटकर, (रा. मनीष नगर,नागपूर), प्रमोद नत्थुजी पारधी, (रा. बहादुरा नागपूर) यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडून ८९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी सर्व जुगारूंना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि अनिल राऊत, पोलिस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर राउत, अरविंद भगत, पोना मयूर ठेकळे, सत्यशील कोठारे, अमृत किनगे, प्रणय बनाफर, रोहन डाखोरे, शैलेश यादव, चालक अमोल कुथे, सुमीत बांगडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com