नागपुरात सकाळपासूनच पाऊस, पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा

rain
raine sakal

नागपूर : शहरात आज (गुरुवारी) सकाळपासूनच पावसाला सुरुवात (nagpur rain) झाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून नागपूरकरांना दिलासा मिळाला. (raining from thursday morning in nagpur)

rain
...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. अधूनमधून काळेकुट्ट ढग जमते, मात्र दणक्याचा पाऊस पडत नाही. त्यामुळे नागपूरकरांची काहीही निराशा झाली होती. मात्र, आज सकाळपासूनच काळेकुट्ट ढग पसरले होते. त्यानंतर काही भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळीच मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांची आणि ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

पुढील तीन-चार दिवस जोरदार पाऊस -

आजपासून येत्या तीन ते चार दिवसात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. तसेच विजांचा कडकडाट आणि जोरदार वाराही असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com