विजेचा धक्का लागल्याने जखमी झाला दुर्मिळ बगळा, शस्त्रक्रियेने मिळाले जीवदान

Bird operation
Bird operation

नागपूर : खापरखेडा पॉवर स्टेशनजवळ विजेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या दुर्मिळ पक्षी म्हणून लाल यादीतील काळ्या बगळ्याच्या पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये प्रथमच झाली आहे. त्याला आता त्याच्या अधिवासात सोडण्याचे आव्हान पशुवैद्यकांसमोर आहे. 

खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये विजेचा धक्का लागल्याने एक पक्षी मृतपाय अवस्थेत पक्षी प्रेमी गणेश लांडे यांना दिसताच त्याची गिरीश खोरगडे यांना फोन करून माहिती दिली. तातडीने ते स्वतः घटनास्थळाजवळ पोहचले व ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आणल्यानंतर तो आययुसीएनच्या लाल यादीतील दुर्मिळ पक्षी काळा बगळा असल्याचे लक्षात आले. रात्रीच डॉ सय्यद बिलाल व सिद्धार्थ मोरे यांनी प्रथमोपचार केले.

सकाळी समीर नेवारे या पक्षी प्रेमीने जिवंत छोटे मासे पकडून आणले. चार ते पाच मासे काळ्या बगळ्याने खाल्यानंतर पक्ष्याची पशुवैद्यकीय चमूंनी पुन्हा तपासणी केली. पाय तुटल्याचे लक्षात आल्याने एक्‍स- रे काढण्यात आला. त्यात पायाचे हाड तुटल्याचे निदर्शनास आल्याने पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल एक तासात ही क्‍लिष्ट अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. 

गुरुवारी ग्रिन पिजन या पक्ष्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात तो अधिवासात मुक्त होईल आणि स्वच्छंद भरारी घेईल असा विश्‍वास आहे. तशीच भरारी काळा बगळा घेईल अशी खात्री मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते आणि त्याच्या चमूला आहे. यातूनच ट्रान्झिटची चमू काय करू शकते, हे चांगले उदाहरण आहे. मांजात अडकलेला शिकरा पक्ष्यालाही याच चमूने मांजातून सुखरूप काढून आणले, उपचार केले होते. 

काळ्या बगळ्याची वैशिष्ट्ये 
- खाद्य : नाकतोडे आणि मासे 
- लांबी 58 सेंटिमिटर 
- स्थानिक पक्षी 
- दुर्मिळ झाल्याने आयसुसीएनच्या लाल यादीत समावेश 
- चोचीखालचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. 
- कमी अंतरावर स्थलांतरीत करतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com