बेड, रेमडेसिव्हिरसाठी कोरोनाबाधितांची मारामार! नातेवाइकांसमोर गंभीर संकट

remdesivir
remdesivirTeam Esakal

नागपूर : दर दिवसाला ३० हजारांवर चाचण्यांमधून सरासरी साडेसहा हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने शहरातील रुग्णालयांची क्षमता संपत आल्याचे चित्र आहे. त्यातच बेड, रेमडेसिव्हिर आणि फॅविपीरावीर औषधांचा तुडवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात १८१ सरकारी, खासगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार सुरू आहेत. मात्र, तरीही खासगीसह मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये एकही खाट मिळत नाही. तसेच खाट, रेमडेसिव्हिर आणि फॅविपीरावीर मिळत नसल्याने रुग्णांचे जीव रस्त्यावर जात आहेत. नुकतेच पीपला रोड येथील एका रुग्णाला खाट न मिळाल्याने त्याला परत घरी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. हे विदारक चित्र महापालिकेसह आरोग्य विभाग उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

remdesivir
यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता

महापालिकेचे प्रशासन असो वा आरोग्य विभागाचे प्रशासन कोरोनाबाधितांवर योग्य उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याबाबत उदासीन आहे. कागदी घोडे नाचवताना शहरातील रिकाम्या असलेल्या रुग्णालयांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सोमवारीपेठेतील अडीचशे खाटांचे राज्य कामगार विमा रुग्णालयाला कोविड हॉस्पिटल तयार केले नाही. येथे सर्व सुविधा आहेत. केवळ काही प्रमाणात ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या या रुग्णालयाकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा आरोग्य उपसंचालक कार्यालयात आहे. वर्षभरात खाटा वाढून चारशे खाटांचे रुग्णालय सहज तयार झाले असते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर कामगार रुग्णालयाकडे वळली होती. तसा निरोपही पाठवला होता, परंतु बदलीनंतर याकडे दुर्लक्ष केले. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या अधिकार क्षेत्रात हे रुग्णालय येते. विशेष असे की, ग्रामीण भागातील एकाही रुग्णालयात फॅविपीरावीर औषध उपलब्ध नाही. केवळ व्हिटॅमिन सी, झिंक गोळ्या वितरण करून कोरोनावर उपचार करण्याचा देखावा होत आहे, अशी तक्रार 'वंचित'तर्फे करण्यात आली आहे.

remdesivir
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांनाच इतर कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी तैनात केले. मात्र, आयुर्वेद रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक मात्र कोणत्याही कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देत नाहीत. राष्ट्रीय संकटाच्या वेळी डॉक्टर म्हणून त्यांचेही योगदान असावे.
- सिद्धांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com