हिंगणघाट : अंकिता जळीतकांडाचा आज निकाल

अनेकांच्या नजराः हिंगणघाट न्यायालय देणार निर्णय
Results of Ankita Case vidarbha Crime Update
Results of Ankita Case vidarbha Crime Updatesakal

हिंगणघाट : येथील प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांडाचा बहुचर्चित निकाल आज बुधवारी (ता. ९) देण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुमारे दोन वर्षे चाललेल्या या प्रकरणात शासनाची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम हजर राहणार आहेत.

प्राध्यापिका अंकिता हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याच्या प्रकरणाचा निकाल शनिवारी (ता. ५) सुनावल्या जाणार होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या निकालाची तारीख वाढविण्यात आली होती. अंकिता पिसुद्दे जळीतकांड प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. दोन वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली.

त्यांना सरकारी वकील दीपक वैद्य यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे आरोपीच्या वतीने ॲड. भूपेंद्र सोने यांनी बाजू मांडली. या प्रकरणात २९ महत्त्वपूर्ण साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या खटल्याचा निकाल येणार आहे. येथील अंकिता पिसुड्डे (रा. दारोडा) या प्राध्यापक युवतीवर तिच्या गावातील विकेश नगराळे या माथेफिरूने ३ फेब्रुवारी २०२० रोजी अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com