RS 2000 Note Exchange : नोटा बदलण्यासाठी गर्दीच नाही

पहिल्या दिवशी शहरातील सर्वंच बॅकांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे चित्र होते. कुठेही गर्दी दिसली नाही.
RS 2000 Note Exchange No rush to exchange notes in nagpur bank
RS 2000 Note Exchange No rush to exchange notes in nagpur banksakal

नागपूर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी बॅंकासमोर रांगा लागतील, त्यामुळे ग्राहकांच्या सुविधेसाठी मंडप टाका, पाण्याची सोय करा अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार मंगळवारपासून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी शहरातील सर्वंच बॅकांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे चित्र होते. कुठेही गर्दी दिसली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास घेतला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकेतून बदलून मिळण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. नोटा बदलून घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, शहरातील विविध बँकांचा फेरफटका मारला असता नोटा बदलण्यासाठी पहिल्या नोटबंदीप्रमाणे कुठेही सकाळी १० ते दुपारी चार वाजेरम्यान रांगा लागल्याचे दिसले नाही.

RS 2000 Note Exchange No rush to exchange notes in nagpur bank
Nagpur : सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट; दहा जण भाजले, दोघे गंभीर जखमी

नोटा बदलण्यास अल्पप्रतिसाद असल्याचे बँकेचे कर्मचारी सांगत होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, कर्नाटक बँक, पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक, आयसीआयसीआय, सेंट्रल बॅंक, कॉसमॉस बॅंक, इतर खासगी बॅंकासह, इंडियन बँक यांच्या समोर नोटा बदलण्याची गर्दी नव्हती.

RS 2000 Note Exchange No rush to exchange notes in nagpur bank
2000 Rupee Note Exhange: नोटा बदलण्यासाठी नागरिकांची भाऊगर्दी! अडीचशे कोटींचा भरणा

अर्ज भरण्याची सक्तीच

रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या नोटा आता सर्व बँका अथवा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये बदलून मिळणार आहेत. नोटा बदलून देण्यासाठी बँकांकडून अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने नोटा बदलण्याबाबत नियमावली जाहीर केली. त्यामुळे संभ्रम वाढला असला तरी इतर बॅंकांनी मिळालेल्या सूचनेनुसारच दहा नोटांसह अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यासाठी विशेष अर्जही सर्वच शाखेत पाठविण्यात आलेले आहेत. ते अर्ज भरुन घेतले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com