esakal | कोरोनाबाधितांकडून लाखो रुपये डिपॉझिट, खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची संदीप जोशींची मागणी

बोलून बातमी शोधा

संदीप जोशी
पुरावे देतो, खासगी रुग्णालयांवर कारवाई करा; संदीप जोशींची मागणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाबाधित (corona) रुग्णांकडून लाखो रुपये आगाऊ रक्कम (डिपॉझिट) घेणाऱ्या रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी महापौर संदीप जोशी (former mayor sandeep joshi) यांनी महापालिका आयुक्तांकडे (nagpur municipal commissioner) केली आहे. (sandeep joshi demand to take action against hospital taking more charges from corona patients in nagpur)

हेही वाचा: १५ टक्के कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठावर वाढला कामाचा बोजा; परीक्षेसह इतर कामे खोळंबली

रुग्णांकडून आगाऊ रक्कम घेऊ नयेत, असे आरोग्यमंत्र्यांचे आदेश आहेत. असे असताना काही रुग्णालये रुग्णांना भरती करण्यापूर्वी लाखो रुपयांचे डिपॉझिट घेत आहेत. त्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा रुग्णालयांना तंबी द्या आणि कठोर कारवाई करावी असे निवेदनही जोशी यांनी आयुक्त राधाकृष्ण बी यांना दिले आहे. १८ एप्रिलला रामदासपेठ येथील एका रग्णालयात तुषार ठावरे या रुग्णाला भरती करण्यापूर्वी तीन लाख रुपये डिपॉझिट भरण्याची अट ठेवण्यात आली. पैसे न भरल्यास रुग्णाला दाखल करून घेतले जाणार नसल्याचे रुग्णालयाद्वारे स्पष्ट सांगण्यात आले. नातेवाइकांनी पैसे भरल्यानंतर एका साध्या कागदावरच शिक्का हा कागद रसिद म्हणून देण्यात आला, असा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

अनेक इस्पितळांमध्ये अशी लुबाडणूक सुरू आहे. महापालिकेने यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले ऑडिटरसुद्धा यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ८० टक्के शासकीय दराने आणि २० टक्के व्यवस्थापनाच्या दराने खासगी रुग्णालयात नियोजन होत नाही. रुग्णाचे नातेवाईक घाबरलेल्या अवस्थेत बेड उपलब्ध असेल त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतात. या स्थितीचा काही रुग्णालये फायदा घेत २० टक्के व्यवस्थापनाच्या दरानेच तो रुग्ण दाखल करून त्यावर रुग्णाच्या नातेवाइकांची स्वाक्षरी करून घेतात. पुढे आक्षेप घेतल्यास रुग्णाला हे मान्य असल्याची स्वाक्षरी केल्याचे दाखवतात. त्यामुळे रुग्णाला दाखल करताना अर्जावर सही करण्यापूर्वी आपला रुग्ण शासनाच्या ८० टक्क्यांमधून भरती केला आहे की व्यवस्थापनाच्या २० टक्क्यांमधून ते तपासून घ्यावे, असेही आवाहन जोशी यांनी केले आहे.