‘पदवीधर’मधील पराभवाची कारणे पंधरा दिवसांत सांगणार; संदीप जोशींचा रोख कुणाकडे?

Sandeep Joshi says The reasons for the defeat in the graduates will be stated in a fortnight
Sandeep Joshi says The reasons for the defeat in the graduates will be stated in a fortnight

नागपूर ः भाजप आता एका विशिष्ट वर्गाचा जुना पक्ष राहिला नाही. दीनदलित, ओबीसींची मते घेणारा पक्ष आहे. त्यामुळेच पदवीधर निवडणुकीत ४२ हजार मते मिळाली. पराभवाबाबत अद्याप विचार केला नाही. परंतु, पंधरा दिवसांत पराभवाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून प्रसारमाध्यमापुढे सांगणार असल्याचे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. महापौरांनुसार पराभवाची कारणे जाणून घेण्यास उत्सुकता वाढली असून, त्यांचा रोख नेमका कुणाकडे? अशी चर्चाही सुरू झाली. 

महापौर कक्षात पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी पदवीधर निवडणुकीतील पराभवावर जास्त भाष्य करण्याचे टाळले. निवडणुकीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पराभवावर अद्याप विचार केला नसल्याचे ते म्हणाले. मात्र, पक्ष पातळीवर मंथन सुरू असल्याचे ते म्हणाले.

तुकाराम मुंढे यांचा विरोध वैयक्तिक नव्हता, त्यांच्या धोरणाला विरोध होता, असे नमूद करीत मुंढेच्या विरोधामुळे पराभव झाल्याचा काही लोकांचा गोड गैरसमज असल्याचा टोलाही लगावला. यापुढेही भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असून पराभूत झाल्याने पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीचे ‘मुंगेरीलाल सपने’

शहराचे विकास कामे रोखण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे कामे रोखायची अन् सत्ताधारी भाजप काहीच करीत नाही, असे लोकांना दाखवून पुढील महापालिका निवडणूक जिंकायचे, असे महाविकास आघाडीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याचे ते म्हणाले. भाजप शहराला पुन्हा विकासाच्या दिशेने घेऊन जाईल, पुढील निवडणूक जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

कॉंग्रेसने सत्यानाश केला

५५ वर्षे सत्ता असताना कॉंग्रेसने केवळ पंधरा जलकुंभ बांधले. भाजपने १५ वर्षांत ८० पर्यंत जलकुंभ बांधून पाण्याबाबत शहराला समृद्ध केले. कॉंग्रेसने इतके वर्षे सत्तेत राहून शहराचा सत्यानाश केला. आता ओसीडब्लूची चौकशी खुशाल करावी. परंतु या प्रकल्पाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुरस्कार दिला होता. हा प्रकल्प देशात राबविण्यात यावा, असे कौतुकही त्यांनी केले होते. निवडणुकीसाठी चौकशी पुढे करण्यात येत असल्याचे जोशी म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com