Video | खापरखेडा फाटकावर धक्कादायक घटना: स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली.. अन् समोरून भरधाव रेल्वे आली

भरधाव रेल्वे जवळ येत होती, रेल्वेखाली बस येणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थी हादरले होते, तर चालकालाही काही सूचेना.
school bus carring 40 student got stuck railway track of khaparkheda nagpur
school bus carring 40 student got stuck railway track of khaparkheda nagpur Sakal
Updated on

नागपूर: दुपारचे चार वाजले, अन् शाळा सुटली. शाळेतून चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस निघाली होती. खापरखेडा रेल्वे फाटक बंद होत असताना चालकाने वेग वाढवत वेगाने फाटक पार करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला आणि फाटक बंद झाल्याने बस रुळावर अडकली.

भरधाव रेल्वे जवळ येत होती, रेल्वेखाली बस येणार अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थी हादरले होते, तर चालकालाही काही सूचेना.अखेर नागरिकांसह रेल्वे इंजिन चालकाच्या समयसूचकतेमुळे वेळीच रेल्वे गाडी थांबली अन् सर्वांनीच सुटकेचा श्‍वास घेतला.

ही थरारक घटना घडली ती छिंदवाडा रेल्वे मार्गावरील खापरखेडा रेल्वे फाटकावर. गुरुवारी (ता.२५) दुपारी चार वाजताच्या सुमारास खापरखेडा येथे महानिर्मितीचे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांची ४० मुले घेऊन पोद्दार इंटरनॅशनल शाळेची स्कूलबस (एमएच- ४०, बीजी- ७७३०) खापरखेडामधील वसाहतीच्या दिशेने जात होती.

बस खापरखेडा फाटकावर रेल्वे रूळ ओलांडत असतानाच, अचानक दोन्हीकडील रेल्वे फाटक बंद झाले. त्यामुळे ही बस नागपूर- छंदवाडा रेल्वे मार्गावर रुळावर अडकली. बससोबत रुळावर एक खासगी कारही अडकली. याचवेळी रुळावरून छिंदवाडा- नागपूर प्रवासी रेल्वे गाडी वेगात खापरखेडाच्या दिशेला जात होती.

ही रेल्वे गाडी बसच्या दिशेने वेगाने येत असल्याचे बघत बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह चालक व वाहक घाबरले. सगळ्यांनी बचावासाठी आरडा-ओरड सुरू केली. यादरम्यान फाटकाजवळ असलेल्या एका सुज्ञ नागरिकाने प्रसंगावधान दाखवून दाखवत जवळचे लाल रंगाचे कठडे रेल्वे रुळावर जाऊन ठेवले.

हे कठडे रेल्वे इंजिन चालकाला रुळावर दिसताच, त्याला शंका आल्याने त्याने तातडीने रेल्वेचे ब्रेक दाबले. काही अंतरावर जाऊन ही रेल्वे गाडी थांबली. गाडी थांबल्याचे बघून त्यातील विद्यार्थ्यांसह इतरांनी सुटकेचा श्वास घेतला.

त्यानंतर रेल्वे फाटकावरील नियुक्त रेल्वे कर्मचाऱ्याने एका बाजूचे फाटक उघडले. त्यानंतर रुळावर अडकलेली स्कूलबस आणि कार बाहेर काढली. त्यानंतर थांबलेली रेल्वे गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेकांनी या व्यक्तीचे धन्यवाद मानले.

school bus carring 40 student got stuck railway track of khaparkheda nagpur
Nagpur Rain Update : अतिवृष्टी, पुरामुळे विभागात ४० हजार हेक्टर क्षेत्र बाधित; ४९ हजार ४३० शेतकऱ्यांचे नुकसान

... तर घडला असता मोठा अपघात

खापरखेडा येथे महानिर्मितीचे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. येथे मोठ्या संख्येने स्थायी व कंत्राटी अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या राहण्यासाठी जवळच महानिर्मितीची कर्मचारी वसाहतीचे गाळे आहे.

तेथे राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मुलांची शाळेत ने- आण करण्यासाठी एका कंपनीला महानिर्मितीकडून स्कूलबसचे कंत्राट दिले आहे. ही बस रेल्वेक्रासिंगवर अडकताच, एक नागरिकाने प्रसंगावधान राखून प्राण वाचविले. मात्र, जराही उशीर झाला असता तर चाळीसही विद्यार्थ्यांना प्राणाला मुकावे लागले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com