esakal | खुशखबर! पदवीसाठी सर्व महाविद्यालयांमधील जागा वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

11th std admission process

खुशखबर! पदवीसाठी सर्व महाविद्यालयांमधील जागा वाढणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात बारावीच्या परीक्षा (12th class exam) रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये निकाल १०० टक्के लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पदवी प्रवेशात वाढीव जागांची गरज भासू शकते. त्यामुळे यावर्षी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी सर्व शाखांमध्ये व सर्व महाविद्यालयात जागा (seats increased in colleges for graduation) वाढविण्याच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान केली जाईल. मात्र, हा निर्णय कोरोना काळापुरता व वर्षासाठीच असेल अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी दिली. (seats for graduation increases in all college says minister uday samant)

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

दहावीच्या निकालाबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आता बारावीच्या निकालासाठी सूचना लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे. दरम्यान बारावीचा निकाल दहावी व अकरावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारावर लावण्यात आला तर मोठ्या संख्येत विद्यार्थी पास होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काहींच्या मते बारावीचा निकाल शंभर टक्के लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाविद्यालयात प्रवेशाचा मोठा ताण महाविद्यालये व संस्थांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शासनाची भूमिका मांडत महाविद्यालयांना तातडीने वाढीव जागा देण्याचा नियम विद्यापीठ कायद्यात आहे. त्यामुळे केवळ या वर्षासाठी महाविद्यालयांना तत्काळ जागा वाढवून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

सर्व शाखेत जागा मर्यादित -

मागील काही वर्षात व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या आहेत. मात्र, जागा रिक्त राहण्याचे प्रमाण बघता अनेक महाविद्यालयांनी त्यांच्या शाखा बंद केल्या. यासोबतच सर्व शाखेत शासनाच्या मान्यताप्राप्त जागा मर्यादित आहेत. अशावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होण्याची शक्यता असल्याने जागा वाढवून देण्यावर भर असल्याचे उदय सामंत म्हणाले.

विभागातील बारावीचे विद्यार्थी

१ लाख ४६ हजार ९९१

नागपूर विद्यापीठामधील शाखानिहाय जागा

  • कला - ४०,०००

  • वाणिज्य - ३०,०००

  • विज्ञान - ३५,०००

  • विधी - १,५००

  • गृहविज्ञान - ४००

  • गृहअर्थशास्त्र - ५००

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा -

  • अभियांत्रिकी - १,३४,३५६

  • फार्मसी - ५१,७३७

  • आर्किटेक्चर - १,१४६

  • हॉटेल मॅनेजमेंट - १,२५२

loading image