नागपूरात शिवसेनेला एकटेच लढावे लागणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur municipal corporation  election
नागपूरात शिवसेनेला एकटेच लढावे लागणार?

नागपूरात शिवसेनेला एकटेच लढावे लागणार?

नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने(ncp-congress) महापालिकेची(nagpur carporation election) निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याने मुख्यमंत्र्यांची शिवसेना एकटी पडली आहे. त्यामुळे सेनेलाही महापालिकेत एकट्याच्या भरोशावरच मैदानात उतरावे लागणार असल्याचे दिसून येते. काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबईत बैठका घेतल्या जात आहेत. तसेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीपुरती महाविकास आघाडीत नक्कीच फूट पडणार आहे. काँग्रेसकडे असलेल्या कार्यकर्त्यांची फौज लक्षात घेता त्यांना १५० जागाही कमी पडतात. प्रत्येकच निवडणुकीत मारामार होत असते.

हेही वाचा: नागपूर : चार दिवसांत २५ टक्क्यांवर विद्यार्थी झाले लसवंत

अशा परिस्थितीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी जागा सोडणे काँग्रेस अवघड आहे. दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शहरात अस्तित्व आहे हेच मानायला तयार नाही. शहरात शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे तीन नगरसेवक असलेल्या पक्षांसाठी ३० जागा सोडण्यास काँग्रेस तयार नाही.

हेही वाचा: अश्लील ॲप्सचा धोकादायक बाजार

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही नुकतीच बैठक घेऊन ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेची गोची होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल यांचे फारसे पटत नाही. उघडपणे हे दोघे एकमेकांना विरोध करीत असतात. राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव दुकान बंद करू, असा इशारा नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला दिला होता. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये चांगलाच तणावर निर्माण झाला होता. नागपूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटले होते. काँग्रेसच्या पराभावनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांचे दुकान बंद झाले, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महापालिकेची निवडणूक लढणार नाही, असे स्पष्ट दिसून येते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top