esakal | सावधान! ओंकारनगर चौकातून जाणार असाल तर जरा थांबा.. आपला जीव वाचवा
sakal

बोलून बातमी शोधा

shopkeepers occupied fgootpaths at omkar nagar square in nagpur

ओंकारनगर चौक हा रिंगरोडवरील अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामेश्वरी (शताब्दी) चौक व मानेवाडा चौक यांच्या मध्ये असलेल्या या चौकात याअगोदरही अपघात झाले आहेत.

सावधान! ओंकारनगर चौकातून जाणार असाल तर जरा थांबा.. आपला जीव वाचवा

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर :  रिंगरोडवर अतिशय वर्दळीचा असलेल्या ओंकारनगर चौकातील भाजी बाजाराचे अतिक्रमण अपघातांना आंमत्रण देणारे ठरत आहे. या चौकातून ओंकारनगरकडे वळणे वा तिकडून येताना या चौकातून डावीकडे वळणे दोन्हीही धोकादायक झाले असून याकडे पोलिस व नागपूर महानगरपालिकेचे पूर्णपणे दूर्लक्ष झाले आहे. अपघातात एखादा बळी गेल्यानंतरच या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे लक्ष जाईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ओंकारनगर चौक हा रिंगरोडवरील अतिशय वर्दळीचा चौक आहे. रामेश्वरी (शताब्दी) चौक व मानेवाडा चौक यांच्या मध्ये असलेल्या या चौकात याअगोदरही अपघात झाले आहेत. तरीही या चौकाला सुरक्षित करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. अलीकडे तर या चौकातील गर्दी अक्षरशः ओसंडून वाहू लागली आहे. ऐन चौकात अगोदरच चार ते पाच मटण दुकाने आहेत. तेथील गर्दी व तेथे येणाऱ्या खवय्यांच्या गाड्यांची मनमानी पार्किंग ही या चौकाची प्रमुख समस्या होतीच. त्यावर उपाय तर शोधला गेला नाहीच. पण, आता तर या चौकात भाजी दुकानांचेही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

अधिक माहितीसाठी - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

अनेक दुकानदारांनी पसरली पथारी 

मानेवाडा चौकातून ओंकारनगरकडे वळताना असलेली कमी जागा अगोदरच तेथील हारफूल विक्रेत्याच्या गाडीने अडवली होती. आता तर त्यात आणखी भाजी दुकानदारांनीही आपली पथारी पसरली आहे. त्यामुळे या वळणावरून ओंकारनगरकडे गाडी वळवताना फारच अडचणीचे झाले आहे. त्याहून धोकादायक स्थिती तर ओंकारनगरकडून शताब्दी चौकाकडे जाणाऱ्या वळणाची झाली आहे. याच वळणावरील पानटपरी व मटणदुकानांचा त्रास वाहतुकीला तर होताच. आता त्यात ऐन वळणावर लागलेल्या भाजीदुकानांनी भर टाकली आहे.

वळण घेण्यास होतोय प्रचंड त्रास 

या वळणावर ऐन रस्त्यात इलेक्ट्रिक डीपीचे खांब आहेतच. आता भाजी दुकानदार तर थेट वाहतूक सिग्नलच्या खांबाला ताडपत्री बांधून दुकाने थाटत आहे. त्यामुळे सिग्नल खांबाच्या डावीकडून वाहनांना जाताच येत नाही. या भाजी दुकानांना लागूनच एक फळ मका कणीस विक्रेत्याने तर आपल्या मालकीची जागा समजूनच ऐन वळणावर दुकान थाटले आहे. त्यामुळे ओंकारनगरकडून शताब्दी चौकाकडे वळणच घेता येत नाही. 

वाहतुकीची होते कोंडी 

ही दुकाने व वळणावर दोन्ही बाजूंनी उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे जागाच उरत नसल्याने सरळ भगवाननगरात जाणारी वाहतूक व शताब्दी चौकाकडे वळणारी वाहतूक दोन्हीही एकाच निमुळत्या जागेत थांबते व त्यामुळेच येथे वाहतुकीचा कोंडी होते. ऐन चौकात वळणावर होणारी ही वाहतुकीची कोंडी एखाद्या अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

रोड दुभाजकाचीही प्रतीक्षा

याच चौकात ओंकारनगरकडील रस्त्यावर रोडदुभाजकाची अतिशय गरज आहे. चौकापर्यंत रोडदुभाजक नसल्याने तिकडून येणारी वाहने सिग्नल नसताना चौकात कशीही उभी राहतात. त्या वाहनांच्या अस्ताव्यस्त गर्दीमुळे शताब्दी चौकाकडून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे ओंकारनगरकडे वळण्यासाठी जागाच उरत नाही. ही परिस्थितीही एखादा अपघात घडवू शकते. हा दुभाजक चौकापर्यंत करण्यासाठीचे साहित्य चार-पाच महिन्यांपासून येऊन पडले होते. पण दुभाजकाचा मुहूर्त मात्र निघाला नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top