युट्यूबवर लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या सिद्धार्थने अंधश्रद्धेतून पोटच्या मुलीची हत्या केली

जादुटोन्याच्या संशयावरुन पाच वर्षाच्या मुलीचा छळ करीत तिला बेदम मारहाण करण्यात तिची स्वतःची बहिणही मागे नव्हती.
Siddharth raised people questions on YouTube killed daughter out of superstition crime news nagpur
Siddharth raised people questions on YouTube killed daughter out of superstition crime news nagpursakal

नागपूर : जादुटोन्याच्या संशयावरुन पाच वर्षाच्या मुलीचा छळ करीत तिला बेदम मारहाण करण्यात तिची स्वतःची बहिणही मागे नव्हती. ती आणि तिचा मावस भाऊही चिमुकलीला बेदम मारहाण करायचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकरणात आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाच वर्षांची चिमुकली अन्नशीला आईवडिलांनीच मारून टाकले. तिच्यात दुष्ट आत्मा शिरल्याचे आईवडिलांना वाटत होते. अन्नशीला मारहाण करण्यात १६ वर्षीय बहिण आणि ११ वर्षीय मावस भाऊही सहभागी होता. याबाबत तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचाही व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

या दोघांनाही आज पोलिसांनी बाल हक्क आयोगासमोर सादर करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी नामदेव बांबोडे ऊर्फ शंकर बाबा (वय ५०,रा.चंद्रपूर) याला अटक केले. पोलिसांनी न्यायालयासमोर सादर करीत १२ पर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. दरम्यान, महिला आयोग आणि नागरी हक्क संरक्षण आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.

सिद्धार्थच्या कृत्याबाबत अनेकांना आश्‍चर्य

आपल्या यु-ट्यूब’ चॅनेलच्या माध्यमातून लोकांचे प्रश्‍न आणि समस्या मांडणाऱ्या सिद्धार्थला आपल्या आयुष्याचे प्रश्‍न सोडविता आले नाही. सिद्धार्थ जादुटोण्याच्या संशयावरुन पोटच्या पोरीचा छळ करीत तिचा खून करेल यावर अद्यापही कुणाचा विश्‍वास बसत नसल्याचे दिसून येत नसून त्याच्या या कृत्याने नातेवाईकही स्तब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com