esakal | Nagpur: सोलर ऊर्जा योजनेचा बट्ट्याबोळ; माजी कृषिमंत्र्यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

सोलर कृषी पंप

सोलर ऊर्जा योजनेचा बट्ट्याबोळ; माजी कृषिमंत्र्यांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरुड (जि. अमरावती) : महावितरणने गाजावाजा करून सोलर ऊर्जेकरिता अनुदानाची घोषणा केली. परंतु मंजुरी मिळाल्यानंतरही कंपन्यांकडून अनुदानावर काम करण्यास नकार देऊन पूर्ण रक्कम भरण्यास सांगितल्या जात असल्याने ग्राहकांची कोंडी होत आहे. त्यामुळे शासनाने सोलर योजनेच्या अनुदानाविषयी स्पष्ट धोरण व आदेश द्यावेत, अशी मागणी माजी कृषिमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

हेही वाचा: इंदापूर: गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

महावितरणने दिलेल्या जाहिरातीनुसार अनेक ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज केले व त्यांना मंजुरी आदेश प्राप्त झाले. विद्युत वितरण कंपनीच्या पोर्टलवरील सुचनेप्रमाणे एका एजन्सीची निवड केली. परंतु त्यांनी योजना कार्यान्वित करण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्या एजन्सीची निवड करण्यात आली. सदर एजन्सीकडून प्रतिनिधीने स्थळनिरीक्षण करून सोलर यंत्रणा आस्थापित करण्यासाठी 1 लाख 20 हजार इतकी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले जाते.

यावेळी अनुदानावर काम करण्यास त्यांनी नकार दिला. विद्युत वितरण कंपनीच्या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज केला असता त्यावर 3 किलोवॅट यंत्रणेसाठी सबसीडी वगळून 74 हजार 484 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल, असे नमूद करण्यात आले. तसेच सोलर यंत्रणा आस्थापित करण्यासाठी शासनाने निवड करूनही त्या कंपन्या अनुदानावर काम करीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांची पॅनलवरील निवड रद्द करावी व त्यांचे लायसन्स निलंबित करावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

हेही वाचा: तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'

"शासनाने सोलर योजनेचा बट्ट्याबोळ केला आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संबंधितांना निर्देशित करावे. जर विद्युत वितरण कंपनी ही योजना राबविण्यास असमर्थ असेल तर इतकी प्रसिद्धी देऊन वीज ग्राहकांना गाजर दाखविण्याचे कारण काय?"- डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री व भाजप नेते

loading image
go to top