नागपुरातील अनलॉकच्या नियमात सोमवारपासून बदल, 'असे' असतील नियम

jalgaon unlock
jalgaon unlocksakal

नागपूर : आधार कार्ड केंद्र (adhar card center), कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट (computer institute), टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय आज जिल्हा प्रशासन, महापालिकेने (changes in unlock rules nagpur) घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संस्था सुरू राहणार आहे. एवढेच नव्हे तर मॉलमधील रेस्टॉरेंटलाही दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे मॉलमध्ये खरेदीसोबतच आता खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तसेच टायपिंग इन्स्टिट्यूट संचालकांसह विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला. (some changes in unlock rules in nagpur from monday)

jalgaon unlock
सरावातून अनन्या झाली कोकिळ; खऱ्या कोकिळेशी रंगतेय जुगलबंदी

ऑक्सिजन बेड ९५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी रिक्त असलेल्या शहरांत निर्बंध शिथिल करण्यात आले. मागील ७ जून रोजी संपूर्ण शहर पाच वाजेपर्यंत सुरू करण्यात आले होते. दर शुक्रवारी आढावा घेतल्यानंतर निर्बंधात शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज निर्बंध आणखी शिथिल करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सायंकाळी आधार कार्ड केंद्र, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट सोमवारपासून पाच वाजेपर्यंत सुरू करण्यासंदर्भात आदेश काढले. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट २० विद्यार्थी किंवा हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या दोन बॅचेसमध्ये एक तासाचे अंतर ठेवणेही बंधनकारक आहे. प्रत्येक बॅचच्या क्लास संपल्यावर सॅनिटायझेशन आवश्यक करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ रेस्टॉरंट १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता मात्र मॉलमधील रेस्टॉरेंटही एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

इनडोअर क्रीडा संकुलाबाबत उत्सुकता -

शहरातील इनडोअर क्रीडा संकुल आज सुरू करण्याचे आदेश काढतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी तसेच संबंधित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी होती. बैठकीत याबाबत चर्चाही झाली. परंतु, इनडोअर क्रीडा संकुल सुरू करणे टाळण्यात आले. इनडोअर क्रीडा संकुलाबाबत क्रीडाप्रेमींत उत्सुकता आहे.

सुरू पण निर्बंधही -

  • पाच वाजेपर्यंत : कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट (२० विद्यार्थ्यांची एक बॅच)

  • दहा वाजेपर्यंत : मॉलमधील रेस्टॉरंट (५० टक्के क्षमतेने)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com