esakal | दक्षिण नागपूर गुन्हेगारांसाठी बनले प्रशिक्षण केंद्र; वचक संपुष्टात | Nagpur
sakal

बोलून बातमी शोधा

 crime

दक्षिण नागपूर गुन्हेगारांसाठी बनले प्रशिक्षण केंद्र; वचक संपुष्टात

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गुन्हेगारांसाठी दक्षिण नागपूर म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे. अनेक मोठमोठे गुन्हेगार दक्षिण नागपुरातून उदयास आले आहेत. रिकाम्या भूखंडावर ताबा मिळविणाऱ्या टोळ्यांच्या सुळसुळाट असून आणि नवगुन्हेगारांसाठी हा परिसर नंदनवन आहे. जुगार अड्डे आणि वरली मटक्यांचे सट्टेबाजांसाठी हक्काचा परिसर म्हणून दक्षिण नागपुराची ओळख आहे.

सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अजूनही गोधन कत्तलखाने बिनधास्त सुरू आहेत. पोलिस उपायुक्तांचे दुर्लक्ष असल्यामुळे पोलिस स्टेशनमधील डीबी पार्टी डोळे झाकून दूध पित असल्याचे चित्र आहे. नंदनवनमध्ये पोलिस दुजाभाव ठेवून दुकानदारांवर कारवाई करीत आहे. अनेक गुन्हेगारांचे नंदनवनमधील काही पोलिसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने पोलिसांचा वचक राहिला नाही. जुगारअड्डे आणि वरली मटका जोरात सुरू आहे. इमामवाड्यात अवैध दारूविक्री जोरात सुरू असून विक्रेत्यांना डीबी पार्टीचा आशीर्वाद आहे. वरली-मटक्याचे केंद्रबिंदू असलेल्या इमामवाड्याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. ड्रग्स तस्करी आणि नंदनवन, सक्करदरा पोलिस यांचे जुने नाते आहे.

नंदनवन पोलिस ठाण्यातील ५ ते ७ पोलिस कर्मचारी पैसे कमविण्यासाठी थेट ड्रग्स तस्करांच्या मागे लागून अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून, खात्यातूनही त्यांना निलंबित करण्यात आले होते. कॉटन मार्केट परिसरातील ‘प्रेमचंद जोडी’ करीत फार्मात असून, वरिष्ठांच्या आशीर्वादाने वचक ठेवून आहेत. मात्र, या जोडगोळीमुळे अनेक वाहनचालक त्रस्त आहेत. या जोडीने वरिष्ठांचे कान भरून काही पोलिस कर्मचाऱ्यांनाही त्रास देणे सुरू केले आहे. वाहतुकीसाठी नेहमी अडचणीचा असलेल्या कॉटन मार्केट चौकात सायंकाळी नेहमी जामची स्थिती राहते. मात्र, पोलिस वसुलीत मग्न असतात, असे चित्र आहे.

loading image
go to top