esakal | नागपूर विद्यापीठाचा विशेष दीक्षान्त सोहळा लॉकडाउनमुळे रद्द; मुख्य दीक्षान्त समारंभही लांबणार 

बोलून बातमी शोधा

special convocation ceremony of RTMNU cancelled due o lockdown

विद्यापीठाद्वारे ११ तारखेला विशेष दीक्षान्त समारंभात सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘कायदे पंडित’ (एलएलडी) मानद उपाधीने सन्मानित करण्यासाठी आयोजित ३ एप्रिलला घेण्यात येणार होता. मात्र, १६ मार्चला राष्ट्रपती कार्यालयाने कार्यक्रमास येण्यास नकार दिल्याने विशेष दीक्षांत सोहळा रद्द करण्यात आला.

नागपूर विद्यापीठाचा विशेष दीक्षान्त सोहळा लॉकडाउनमुळे रद्द; मुख्य दीक्षान्त समारंभही लांबणार 
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विशेष दीक्षान्त समारंभ ११ एप्रिल आयोजित करण्यात येणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. आता यामुळे २३ एप्रिल रोजी नियोजित मुख्य दीक्षान्त समारंभही रद्द होणार असून तो लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहे. 

विद्यापीठाद्वारे ११ तारखेला विशेष दीक्षान्त समारंभात सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘कायदे पंडित’ (एलएलडी) मानद उपाधीने सन्मानित करण्यासाठी आयोजित ३ एप्रिलला घेण्यात येणार होता. मात्र, १६ मार्चला राष्ट्रपती कार्यालयाने कार्यक्रमास येण्यास नकार दिल्याने विशेष दीक्षांत सोहळा रद्द करण्यात आला. त्याऐवजी ११ एप्रिलला विशेष दीक्षान्त घेण्याची मागणी परवानगी राज्यपालांना मागण्यात आली. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्गात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ११ ताराखेला होणारा विशेष दीक्षान्त समारंभही रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने रद्द करण्याचे ठरविले. 

बाधित वृद्धाचे आत्महत्या प्रकरण : २० तासांपासून रुग्ण खाटेवर नसतानाही केस पेपरवर सुरू...

आता नव्या तारखेसाठी राज्यपाल आणि सरन्यायाधीशांकडे संपर्क साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २३ एप्रिलला शरद बोबडे यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी त्यांना ‘कायदे पंडित’ या मानद उपाधीने सन्मानित करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाची धडपड सुरू आहे. त्यामुळे हा कार्यक्रम २३ एप्रिलला घेण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. 

त्यातूनच २३ एप्रिलला होणारा मुख्य दीक्षान्त समारंभ जवळपास रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याशिवाय अद्याप नवी तारीख मिळाली नसल्याने विशेष दीक्षान्त समारंभावरही संभ्रम निर्माण झाला आहे. 

टाळेबंदीने वाढविली चिंता

राज्यात सर्वत्र ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान बाहेर पडणे जवळपास सर्वांनाच अशक्य आहे. या प्रकाराने मुख्य दीक्षान्त समारंभ घेता येणे शक्य नाही. दुसरीकडे २३ तारखेला शरद बोबडे यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी विद्यापीठाद्वारे राज्यपाल आणि सरन्यायाधीशांना वेळ आणि तारीख मागविण्यात येणार आहे. 

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी

विद्यापीठाच्या विशेष दीक्षान्त समारंभाच्या नव्या तारखेसाठी संपर्क करण्यात येत असून त्या तारखा येताच तयारी पूर्ण करीत, सोहळा पार पाडण्यात येईल. 
डॉ. सुभाष चौधरी, 
कुलगुरू.