वडील मृत्यूशय्येवर, मुलाने दिला पेपर...

नितीनची संघर्षकथा : दहावीत उत्तीर्ण होत मिळविले ७१ टक्के
ssc result 2022 success story student gave his tenth exam father death Father wish pass the ssc exam nagpur
ssc result 2022 success story student gave his tenth exam father death Father wish pass the ssc exam nagpursakal

नागपूर : मुलगा मुकबधीर असल्याने त्याने किमान दहावी उत्तीर्ण व्हावे अशी वडीलांची इच्छा. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याचे यश बघण्यापूर्वीच अगदी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी त्याने अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मृत्यूचे दुःख मनात ठेवून संपूर्ण परीक्षा देत, दहावीमध्ये ७१. ६० टक्क्यासह उत्तीर्ण होऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली. ही कहाणी आहे नितीन ठाकरे या मुकबधीर मुलाची. नितीन ठाकरे हा शंकरनगरमधील मूकबधिर शाळेचा विद्यार्थी. तो मूकबधिर असला तरी त्याला चांगले शिक्षण देण्याचा संकल्प त्याच्या वडिलांनी केला.

नितीनही नियमित अभ्यास करायचा. दहावीचे वर्ष होते. कोरोना काळात शाळा बंद होत्या. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू होते. नितीन प्रत्येक वर्ग नियमित करायचा. दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी विज्ञान -१ चा पेपर असताना, वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्याची लगबग सुरू झाली. सकाळी दहा वाजता शाळेत उपस्थित राहायचे असताना अचानक वडीलांना आलेला हृदयविकाराचा झटका त्यातून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सगळेच शोकाच बुडाले. यावेळी परीक्षा की घरच्यांना या परिस्थितीत आधार द्यावा या विवंचनेत असताना, त्याला वडिलांचे दहावीत उत्तीर्ण होण्याचे शब्द आठवले. त्यातून मनाशी पक्का निर्धार करीत, त्याने शाळा गाठली आणि पेपर दिला. उर्वरित सर्व पेपर त्याने देत परीक्षा पूर्ण केली. आज निकाल लागल्यावर त्यात ७१.६० टक्के मिळविले. एकीकडे वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद तर दुसरीकडे ते नसल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com