esakal | बोगस गुणपत्रिका देणारे रॅकेट सक्रीय, बनावट दाखल्यांच्या आधारे घेतले वैद्यकीय शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

fake stamp

बोगस गुणपत्रिकेचे रॅकेट सक्रीय, बनावट दाखल्यांच्या आधारे वैद्यकीय शिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बोगस ते बोगसच असते. कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याचा भांडफोड होतोच. याच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. काही विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या बोगस गुणपत्रिकांच्या आधारे (fake document scam) वैद्यकीय शिक्षण घेतल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा बोगस गुणपत्रिका (fake mark sheet) देणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. (student get medical education on basis of fake mark sheets)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

शिक्षणाची बोगस गुणपत्रिका देणारे रॅकेट राज्यात सक्रिय आहे. अशाच रॅकेटने काही विद्यार्थ्यांना दहावी व बारावी बोगस गुणपत्रिका दिली. याआधारे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. तसेच क्लिनिकही उघडले. या डॉक्टरच्या शिक्षणाची तक्रार साताऱ्यातील गुन्हे शाखेत झाली. त्यांच्याकडे चार विद्यार्थ्यांची तक्रार करण्यात आली होती. यातील दोन विद्यार्थी नागपुरातील रेशीमबाग येथील एका शाळेत शिकल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडक दिली. विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची गुणपत्रिका ज्या शाळा, कॉलेजची दिली होती, त्याची विचारणा करण्यात आली. शिक्षण विभागाने संबंधित शाळेचा शोध घेतला. परंतु, ती शाळाच अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली. यामुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. तशी माहिती शिक्षण विभागाने दिल्याचे समजते. पोलिसांकडे तक्रार करणार हा बनावट गुणपत्रिका देणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्र असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अनेकांकडे बनावट मार्कशिट -

१९९९ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘कोहचाडे‘ या नावाने गुणपत्रिकेचा घोटाळा देशभर गाजला होता. या प्रकरणातही नागपुराशी संबंध आहे. त्यामुळे बनावट गुणपत्रिका तयार करणारे रॅकेट नागपुरात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

प्रवेश देताना तपासणी होणे आवश्यक -

वैद्यकीय क्षेत्र हे नागरिकांशी थेट संबंधित आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे वैद्यकीयसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांच्या गुणपत्रिकेची तपासणी होण्याची गरज आहे.

loading image