विद्यार्थी जास्त, बसण्याची सुविधाच नाही; महाविद्यालयांची परिस्थिती

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांची परिस्थिती; वर्गखाेल्या, फर्निचर मर्यादित
college
collegesakal

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर बोर्डाच्या परीक्षा शाळास्तरावर घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एका बाकावर एक विद्यार्थी’ या प्रमाणे आसन व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील नामांकित १४ संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत इतकी मोठी व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या केंद्रांवर परीक्षा कशी पार पडेल, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

राज्यात दोन वर्षांनंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या ४ तारखेपासून बारावीच्या परीक्षा सुरू करण्यात येत आहे. या परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहेत. त्या घेत असताना कोरोना नियमांचे पालन शाळांना करायचे आहेत.

नियमानुसार एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविणे आवश्‍यक करण्यात आले आहे. मात्र, शहरासह काही कनिष्ठ महाविद्यालयात पुरेशा सुविधा नाही. बऱ्याच शाळा आणि महाविद्यालयात पुरेशे फर्निचर नाही. याशिवाय वर्ग खोल्या मर्यादित आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कशी करावी हा मोठा प्रश्‍न आहे.

पायाभूत सुविधांच्या पाहणीकडे दुर्लक्ष

कुठलीही नवी वाढीव तुकडी देत असताना, विभागीय उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समितीमार्फत त्या-त्या शाळांमध्ये नव्या तुकडीसाठी वर्गखोल्या व इतर सोयी-सुविधा आहेत काय? याची तपासणी केल्या जाते. मात्र, या प्रक्रियेला टाळून बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नव्या तुकडीचे सर्रास वाटप करण्यात आले. त्यामुळे आता ही समस्या निर्माण झालेली आहे.

कनिष्ठ महाविद्यालये - प्रवेश क्षमता

  • प्रेरणा हायस्कूल, रेशिमबाग - ९२०

  • निराला हायस्कूल, हंसापूरी - ४९३

  • बाबानानक हायस्कूल, गरोबा मैदान - ४४२

  • आर.एस.मुंडले, उत्तर अंबाझरी मार्ग - ५००

  • दादा रामचंद बाखरु सिंधू कनिष्ठ महाविद्यालय - १,०४९

  • मधूकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कनिष्ठ महाविद्यालय - ४५७

  • मेजर हेमंत जकाते, म्हाळगीनगर - ८७८

''शहर आणि ग्रामीण भागातील बऱ्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सुविधा नसताना त्यांना परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोना नियम विषयक शासन आदेशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील शाळांची आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी.''

- रवींद्र फडणवीस, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

''आमच्यावर आरोप करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ ही अधिकृत संस्था नाही. त्यामुळे अशा प्रकारे आरोप करुन आमच्या संस्थेची बदनामी करू नये. आमच्याकडे विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी पुरेशी व्यवस्था आहे.''

- प्रा. मधुसूदन मुडे, मुख्याध्यापक, मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com