
Swasthyam 2023 : सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा प्रवेशिका ५ जूनपर्यंत करा जमा
नागपूर : सकाळ माध्यम समूहातर्फे मागील १३ फेब्रुवारी ते २५ मे २०२२ यादरम्यान सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा सर्व वयोगटातील वाचकांसाठी होती. या स्पर्धेअंतर्गत दैनिक सकाळच्या अंकात दररोज एक कूपन प्रसिद्ध करण्यात आले.
वाचकांना चौफेर विषयाचे ज्ञान मिळावे व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकाळमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे शेवटचे १०० वे कुपन २५ मे २०२३ ला प्रकाशित होणार आहे.
ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे, त्यांनी किमान ९० कुपन्स चिकटलेली आपली प्रवेशिका नाव, पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरून व पाकिटात घालून कुरियर, पोस्टाद्वारे सकाळच्या कार्यालयात पाठवावी किंवा स्थानिक एजंट, स्थानिक बातमीदार किंवा समक्ष यापैकी एका पद्धतीने ५ जूनपर्यंत जमा करावी, असे आवाहन सकाळतर्फे करण्यात आले आहे. नागपूर शहरातील विविध ठिकाणी प्रवेशिका जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांनी नजीकच्या ठिकाणी जाऊन प्रवेशिका जमा कराव्या.
प्रवेशिका जमा करण्याचे ठिकाण
१) सकाळ कार्यालय, सेंट्रल बाजार रोड, क्रिम्स हॉस्पिटलच्या बाजूला, रामदासपेठ, नागपूर
२) सकाळ कार्यालय, हिंगणा एमआयडीसी, नागपूर
३) प्रवीण हार्डवेअर अँड जनरल स्टोर्स, शॉप नंबर ०२, भांगे गार्डन लॉन,त्रिमूर्तीनगर रिंग रोड, नागपूर.
४) शेखर न्यूजपेपर स्टॉल, कल्पवृक्ष हॉस्पिटलच्या समोर, छत्रपती चौक, रिंग रोड, नागपूर
५) लेगहाऊस, अनिल वस्त्र भंडार समोर, सुरक्षानगर, गजानन सोसायटी, दत्तवाडी, अमरावती रोड, नागपूर
६) अक्षय स्पोर्ट्स शॉप, जिल्हा परिषद शाळेजवळ, वानाडोंगरी बस स्टॉप, हिंगणा रोड, नागपूर
७) साईराम मोबाईल शॉपी, उपाध्ये रोड, शिवमंदिर जवळ महाल, नागपूर
८) सुवर्ण शॉपी, ताजनगर, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा सिमेंट रोड, नागपूर
९) गमपवार ईलेक्ट्रानिक्स शॉप, केतकी कॉम्प्लेक्स नंबर ७, शॉप नंबर जी ३, नंदनवन सिमेंट रोड, नागपूर
१०) जितू फ्लॉवर्स, अचरज टॉवर समोर, छावणी चौक, नागपूर.
११) विजय बुक स्टॉल, इंदोरा चौक , जरीपटका रोड नागपूर