नामवंत शासकीय रुग्णालयात जखम शिवण्यासाठी नाही धागा, रुग्णांच्या हाती चिठ्ठ्या

surgery
surgerye sakal

नागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) (IGMC nagpur) वर्षभरापासून औषधसाठा अपुरा आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात रुग्णसेवा देणारे डॉक्‍टर रुग्णांच्या हाती खासगी औषधालयातून औषधे आणण्यासाठी 'प्रिस्क्रिप्शन' देतात, हे नित्याचेच झाले आहे. परंतु, मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांना जीवनदान देण्यासाठी असलेल्या "कॅज्युअल्टी'मध्ये देखील सर्जिकल साहित्य आणि औषधांचा (surgical material and medicine shortage) तुटवडा असतो. कॅज्युअल्टीमध्ये रात्री फ्रॅक्‍चर झालेल्या रुग्णांची जखम शिवण्यासाठी 'धागा' देखील मागवला जातो.

surgery
सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’

मध्यरात्री अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे ही माफक अपेक्षा नातेवाईकांची असते. परंतु मेयोच्या कॅज्युअल्टीत रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांपासून तर स्टिचेससाठी आवश्‍यक (सूचर) धागा देखील बोलावण्यात येत आहे. नाईलाजाने आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक मेयो व शेजारच्या परिसरात मध्यरात्री औषधांसह सर्जिकल साहित्यात मोडत असलेला स्टिचेस करण्यासाठी धागा आणण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव असे. मेयोच्या कॅज्युअल्टीमध्ये जीवनरक्षक औषधांसह धागा देखील उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मेयोत पेंटाजोल, एंटासिल, ऑन्डेम, मेट्रानिडाजोल, पैंटाप्रेजोल सारखे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रभारी अधिष्ठाता. डॉ. भावना सोनवणे यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांचा फोन नुसताच खणखणत होता.

कोरोनाच्या रुग्णांना मोफत औषधं -

केवळ कोरोनाबाधित रुग्णांना मागील दीड वर्षांपासून मोफत औषधं देण्यात येतात. मात्र, इतर आजाराच्या बीपीएल रुग्णांना देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे. मेयो रुग्णालयात दिवसाला सुमारे दीड हजारावर रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंदणी होते. यापैकी पन्नास ते साठ रुग्णांना भरती करण्यात येते. मात्र, उर्वरित रुग्णांना औषधं लिहून घरी पाठवण्यात येते. आवश्यक औषधं देण्याऐवजी त्यांच्या हातावर प्रिस्क्रिप्शन ठेवल्या जाते. बीपीएल रुग्णांनाही बाहेरून औषधं खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. डेंगीच्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधं खरेदी करून आणा, असे फर्मान सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com