Be positive : कोविडला संधी म्हणून पाहिले; कोरोनामुक्त टहलियानी परिवाराचे मत

Be positive : कोविडला संधी म्हणून पाहिले; कोरोनामुक्त टहलियानी परिवाराचे मत

नागपूर : एखाद्या परिवारातील छोट्या मुलाला कोरोनाची (coronavirus) लागण झाल्यास त्याला चौदा दिवस एका बंद खोलीत विलगीकरणात ठेवणे आई-वडिलांसाठी फार मोठे आव्हान असते. मात्र, सरोजनगर, फ्रेंड्स कॉलनी येथील टहलियानी कुटुंबाने ते आव्हान यशस्वी स्वीकारून स्वतःसह मुलालाही कोरोनामुक्त केले. कोरोनाकडे आजाराऐवजी संधी (Be positive) म्हणून पाहिल्यास त्यावर सहज विजय मिळविता येऊ शकतो, असा संदेश टहलियानी परिवाराने यानिमित्ताने संक्रमितांना दिला आहे. (tahaliya family said Dont be afraid of Corona)

ॲड. रितेश टहलियानी हे उच्च न्यायालयात वकिली करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाला (विहान) सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याचवेळी रितेश व त्यांच्या पत्नीलाही अंगदुखी व हलका ताप आला. शिवाय जिभेची चव गेली आणि वासही येत नव्हता. ही कोरोनाची लक्षणे असू शकतात, अशी शंका आल्याने तिघांनीही चाचणी करून घेतली. त्यात तिघेही पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिघेही होम क्वारंटाईन झाले. संयुक्त परिवार असल्याने कर्करोगाने आजारी असलेली आई आणि भावाच्याही परिवाराची चाचणी केली. सुदैवाने ते सर्व जण निगेटिव्ह आलेत.

Be positive : कोविडला संधी म्हणून पाहिले; कोरोनामुक्त टहलियानी परिवाराचे मत
तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

विलगीकरणात टहलियानी परिवारासमोर दोन मोठी आव्हाने होती. त्यांची सहा महिन्यांची मुलगी आणि कधीही एका जागेवर न थांबणारा मुलगा. मास्क, सॅनिटायझर व 'डिस्टन्स'च्या मदतीने त्यांनी दुधपित्या मुलीची तर योग्य काळजी घेतली. परंतु, चंचल मुलाला एका खोलीत थांबवून ठेवताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. टीव्ही, मोबाईल, ऑनलाइन परीक्षा व इतर 'क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिज'च्या माध्यमातून त्यांनी मुलाला कसेबसे बिझी ठेवत तिघांनीही कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकले. नियमित उपचार, योगा, प्राणायाम, मेडिटेशन व व्यायामासोतबतच कोरोनाचे नियम पाळल्यामुळेच हे शक्य झाल्याचे रितेश यांनी सांगितले.

शिस्त, संयम व सकारात्मकता आवश्यक

रोटरी क्लबचे सदस्य असलेले ॲड. रितेश म्हणाले, संक्रमण काळात उपचारासोबतच शिस्त, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. कसलेही दडपण न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची व परिवारातील इतरांची काळजी घेतल्यास कोरोनावर सहज विजय मिळविता येऊ शकतो. या काळात आम्ही अगदी 'रुटीन लाइफ' जगलोय. दोन आठवडे 'वर्क फ्रॉम होम' ही केले. कोरोनाकडे आम्ही आजार म्हणून नव्हे, तर एक संधी म्हणून पाहिले. कदाचित त्यामुळेच आम्ही तिघेही यातून लवकर 'रिकव्हर' होऊ शकलो.

(tahaliya family said Dont be afraid of Corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com