esakal | टॅक्सी चालकांना टॅक्स भरण्याची सोय नाही; चाके थांबली; सरकारकडून मदतीची अपेक्षा

बोलून बातमी शोधा

Taxi

टॅक्सी चालकांना टॅक्स भरण्याची सोय नाही; चाके थांबली; सरकारकडून मदतीची अपेक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे जीवनाच्या चक्राला ब्रेक लागला. रोजगारावर परिणाम झाला. खासगी वाहनांची चाकेही जाम झाले. त्यामुळे अशा वाहन चालकांनाही जगण्याचा प्रश्न भेडसावत आहे. कोरोना निर्बंधांमुळे अनेकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून मदत देण्यात येत असली तरी अनेक व्यवसाय यातून सुटले आहेत. निर्बंधांमुळे टॅक्सी परवानाधारकांचे वाहन जागीच असल्याने टॅक्स भरायचा कसा असा, प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यामुळे हा टॅक्स माफ करावा किंवा इतरांप्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

हेही वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

सरकारने दिलेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला अनेकांनी आत्मसात केला आहे. यातून काहींनी खासगी वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यासाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन केले. अनेकांनी टॅक्सी परवाना घेतला. या परवानाधारकांना शासनाकडे महिन्याला टॅक्स भरावा लागतो. कोरोना आणि लॉकडाउनमुळे या व्यवसायावर निर्बंध आले. इतरत्र जाण्याचे प्रमाणही थांबले आहे. तसेच सरकारच्या नियमांमुळेही या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे विशेषतः छोट्या व्यावसायिकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहेत.

जुना बाबुळखेडा येथील रहिवासी मंगशे ढेपे यांच्याकडे दोन वाहन आहेत. टॅक्सी परमीट असल्याने राज्यासह देशातील अन्य राज्यात जाण्यासाठी त्याच्याकडे बुकिंग येत असे. यातूनच त्यांचे घर चालते. शिवाय वाहन चालकाचेही घर चालण्यास मदत होते. परंतु, आता त्याच्यासोबत चालकही अडचणीत आले आहेत.

मंगशे यांनी सांगितले की, मध्यंतरीच्या काळात व्यवसाय थोड्याफार प्रमाणात ठिक होत. आता निर्बंधांमुळे अडचण होत आहे. दोन्ही गाड्या घरीच आहे. उत्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे टॅक्सी परमीटचा टॅक्स भरावा कसा, हा प्रश्न आहे. सरकारने अनेकांना मदत जाहीर केली. तशीच छोट्या टॅक्सी परमिटधारकांनाही द्यायला हवी.

हेही वाचा: बापरे! १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर २२५ रुपयांना; चक्क जिल्हाधिकारी ऑफिससमोरच काळाबाजार

चंद्रमणीनगरचे रहिवासी उमेश गेडाम यांनी सांगितले की, त्याच्याकडे एक टॅक्सी परमीटचे वाहन आहे. महिन्याला चार हजार रुपये टॅक्स भरावा लागतो. परंतु, वाहन घरीच आहे. गेल्या महिनाभरात एकदाच बुकिंग आले. त्यानंतर एकही बुकिंग आले नाही. वर्षभरापासून हीच स्थिती आहे. वाहनाचा खर्चही पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे सरकारे आम्हाला मदत केली पाहिजे. सरकारने दरमहा पाच हजार रुपये मदत करावी नाही तर किमान टॅक्स तरी माफ करावा.

संपादन - अथर्व महांकाळ