शेतात पोहोचताच चमुला सापडले वाघाचे कातडे, चारही पायाचे पंजे

शेतात पोहोचताच चमुला सापडले वाघाचे कातडे, चारही पायाचे पंजे

नागपूर : व्याघ्र दिनाच्या दिवशीच नागपूर वनविभागाच्या चमूने वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेशात छापा टाकून अटक केली. त्याच्याकडे वाघाच्या कातड्यासह चारही पायांचे पंजे सापडल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी एकटा आहे की आंतरराज्य टोळीचा सदस्य आहे याचा तपास वन विभागाकडून केला जात असल्याची माहिती आहे. (The-killing-of-the-tiger-Accused-Arrested-Action-on-Tiger-Day-Nagpur-Crime-News-nad86)

वन विभागाला मिळालेल्या माहितीवरून मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावी चमू पोहोचली. रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान, नागपूर वनविभागाच्या चमूने गावातील वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या मोतीलाल केजा सलामे यांच्या घरी छापा टाकून ताब्यात घेतले. चमूने त्याची कसून चौकशी केली. तसेच घराची तपासणी केली असता शेतातही घर असल्याची माहिती मिळाली.

शेतात पोहोचताच चमुला सापडले वाघाचे कातडे, चारही पायाचे पंजे
शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

वन विभागाच्या चमुने शेतातील घराकडे धाव घेत तपासणी केली. तपासणीत वाघाचे कातडे, चार पायाचे पंजे सापडले. ते वन विभागाने जप्त केले. या प्रकरणी वनगुन्हा दाखल केला आहे. यात अजून काही शिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास वन विभाग करीत आहे. वनविभागाने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सावनेर यांचे न्यायालयात सादर केले असता त्याला तीन ऑगस्टपर्यंत वन कोठडी दिली आहे.

शिकाऱ्याकडून जिओ कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक पथक प्रमुख एन.जी.चांदेवार, वन परिक्षेत्र अधिकारी पी.एन. नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठोकळ, एस.बी.मोहोड, खापा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक डोंगरे, शेंडे आणि भोसले यांनी ही कारवाई केली. तपास सहाय्यक वन संरक्षक एस.टी. काळे करीत आहेत.

(The-killing-of-the-tiger-Accused-Arrested-Action-on-Tiger-Day-Nagpur-Crime-News-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com