बापरे! युवक जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचला ठाण्यात

बापरे! युवक जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचला ठाण्यात

नागपूर : यू ट्यूबवर (YouTube) आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. यामुळेच की काय यू ट्यूबचा वापर चांगलाच वाढला आहे. काही नवीन शिकण्यासाठीही नागरिक याचा वापर करू लागले आहेत. मात्र, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा वापर चांगल्याच कामासाठी होईल, हे नक्की नसते. याचा प्रत्यय शनिवारी नंदनवन पोलिसांना कळते. एक युवक चक्क यू ट्यूबवर बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण (Bomb making training) घेऊन ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांची चांगलीच (reached the police station with bomb) तारांबळ उडाली. (The-youth-reached-the-police-station-with-a-bomb)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल युवराज पगाडे (वय २५, रा. साईबाबानगर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याने यू ट्यूब काही व्हिडिओ बघून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. व्हिडिओत बघितल्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट आदींच्या साहाय्याने बॉम्ब तयार केले. मात्र, बॉम्ब निकामी करता येत नसल्याने तो घाबरला.

बापरे! युवक जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचला ठाण्यात
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

पोलिसांनाच बॉम्ब निकामी करता येईल हे त्याला माहीत होते. यामुळे तो तयार केलेल्या बॉम्बसह नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचला. युवकाजवळ जिवंत बॉम्ब असल्याचे पाहून पोलिसही हादरले. पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला याची माहिती दिली. पथक लगेच ठाण्यात पोहोचले. पथकाने काही वेळात तो बॉम्ब निकामी केला. पोलिसांनी राहुलविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

मोठा अनर्थ टळला

घाबरलेला राहुल बॉम्ब घेऊन ठाण्यात पोहोचला. तेथे उपस्थित हवालदाराला आपल्याजवळ बॉम्ब असल्याची महिती दिली. मात्र, पोलिसांनी मनोरुग्ण असल्याचे समजून राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने बॅगमधून बॉम्ब काढून दाखवताच पोलिसांना विश्वास झाला आणि धावाधाव सुरू झाली. वेळीच बॉम्ब निकामी केल्‍याने मोठा अनर्थ टळला.

(The-youth-reached-the-police-station-with-a-bomb)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com