esakal | दोन ड्रग्ज तस्करांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Two drug smugglers arrested 10 lakh worth of property confiscated

पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास वाडी ठाण्याच्या हद्दीत अंबाझरी गेट क्र.एकजवळ सापळा रचला. त्यात आरोपी सैयद सजाद आणि विनेक सांडेकर अडकले. दोघांचीही झडती घेतली असता ५८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली.

दोन ड्रग्ज तस्करांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मुंबईतून नागपुरातील अनेक कॅफे आणि हॉटेल्समधील पार्टीत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५८ ग्रॅम ड्रग्जसह १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सैयद सजाद ऊर्फ सदाम लियाकत अली (२६, रा. भालदारपुरा, गणेशपेठ) आणि विनेक दिलीप सांडेकर (२६, रा. तुमसर. जि. भंडारा) अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात काही ड्रग्जतस्कर सक्रिय झाले आहे. ते मुंबईतून नागपुरात ड्रग्जतस्करी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. माहितीच्या आधारे त्यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचला. पोलिस तस्करांचा मागोवा घेत होते. दरम्यान, दोन्ही तस्करांनी वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ड्रग्ज तस्करी करण्याचा डाव आखला. त्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अधिक माहितीसाठी - नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?

पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास वाडी ठाण्याच्या हद्दीत अंबाझरी गेट क्र.एकजवळ सापळा रचला. त्यात आरोपी सैयद सजाद आणि विनेक सांडेकर अडकले. दोघांचीही झडती घेतली असता ५८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. तसेच आरोपींकडून चार महागडे मोबाईल आणि कार जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून १० लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

दोन्ही आरोपींना पोलिसांना न्यायालयात उपस्थित केले असता दोघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कामगिरी डीसीपी राजमाने यांच्या मार्गदर्शनात एनडीपीएसचे प्रमुख सार्थक नेहते, पीएसआय बलराम झाडोकार, मयूर चौरसिया, प्रदीप पवार, समाधान गिते, नामदेव टेकाम, कपिल तांडेकर यांनी केली.

loading image