Nagpur News |अंमली पदार्थ तस्करीमध्ये आणखी दोन जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two more arrested in Nagpur drug trafficking

नागपूर : अंमली पदार्थ तस्करीमध्ये आणखी दोन जण ताब्यात

नागपूर : कॅटरिंगच्या नावावर ओडीशातील संबलपूर आणि देशात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटक होणाऱ्यांची संख्या सातवर गेली असून यामध्ये आरपीएफमधील एक कर्मचाऱ्याला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

रामेश्वर ऊर्फ गोलू देवाशंकर वर्मा (वय ३०) व त्याचा भाऊ अभिषेक वर्मा (वय २१), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हा शाखेने कॅटरिंगच्या नावावर अंमली पदार्थाची तस्करी करणारा मुख्य सुत्रधार अभिषेक ललित पांडे (वय १९, रा. भीमनगर, एमआयडीसी), अरुण ऊर्फ सोनू राजकुमार ठाकूर (वय २८,रा.फेटरी), आरपीएफचा उपनिरीक्षक रामसिंग चोथमल मीना (वय ३०,रा.शांतीनगर), लवलेश ऊर्फ भुऱ्या ऊर्फ कुश चंद्रमोहन माळी (वय २३,रा. जागनाथ बुधवारी) व विजय ऊर्फ बंटी गुप्ता (वय ३०, रा. मेहंदीबाग) याला अटक केली. त्यांना शनिवारपर्यंत (ता.९) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Two More Arrested In Nagpur Drug Trafficking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur