गोरेवाड्यातील दोन वाघ, अस्वल जाणार दिल्लीला; एक्सचेंजमध्ये मिळणार अल्बिनो काळवीट आणि सांबर 

two tigers and bears will send to delhi fron Gorewada National park Nagpur
two tigers and bears will send to delhi fron Gorewada National park Nagpur

नागपूर ः वाघांच्या प्रजनन काळात त्यांच्या गुणसूत्र गुणधर्मात बदल व्हावा म्हणून दिल्ली येथील प्राणिसंग्रहालयात गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील दोन वाघ पाठविण्यात येणार आहे. 

यापूर्वी सूलतान (सी १) हा वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविल्यात आला होता. त्यानंतर आता दिल्ली येथील प्राणिसंग्रहालय प्रशासनाने वाघाची मागणी महाराष्ट्र वन विकास महामंडळाला पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

दिल्ली प्राणिसंग्रहालयाने साहेबराव आणि अजून एका वाघाची मागणी केली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहेबराव हा वाघ एका पायाने अधू असल्याने त्याला पाठविता येणार नसल्याचे म्हटले आहे. दोन वाघासह दोन नर आणि मादी अस्वलांचीही मागणीही दिल्ली प्राणीसंग्रहालयाने केली आहे. त्याबदल्यात अल्बिनो काळवीट, सांबरासह इतरही प्राणी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला मिळणार आहे. 

अद्यापही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे अद्यापही एफडीसीएमने प्रस्ताव पाठविलेला नाही. तत्पूर्वी हे वन्यप्राणी पाठविण्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबद्दल बोलताना महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वासूदेवन म्हणाले की, दिल्ली प्राणीसंग्रहालयासाठी वाघ आणि अस्वलाची मागणी केलेली आहे. त्याबदल्यात अल्बिनो सांबर आणि काळवीट मिळणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com