उमरेडची वंडरगर्ल सृष्टी शर्मा सहाव्यांदा गिनेस बुकमध्ये

लिंबो स्केटर सृष्टी शर्माच्या विश्वविक्रमावर शिक्कामोर्तब
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसकडून आलेले प्रमाणपत्र दाखविताना सृष्टी शर्मा.
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसकडून आलेले प्रमाणपत्र दाखविताना सृष्टी शर्मा.Sakal

नागपूर - क्रीडा वर्तुळात वंडरगर्ल म्हणून ओळखली जाणारी उमरेडची लिंबो स्केटर सृष्टी शर्मा हिने प्रतिष्ठेच्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये सहाव्यांदा नाव कोरून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. लिंबो स्केटिंगमध्ये सहा विश्वविक्रम करणारी सृष्टी ही जगातील पहिली महिला स्केटर ठरली आहे. १७ वर्षीय सृष्टीने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये उमरेड तालुक्यातील उदासा-गौसत रोडवर ‘फास्टेस्ट टाईम टू लिम्बो स्केट ओव्हर ५० मीटर’ या प्रकारात ७.३८३ सेकंद इतकी वेगवान वेळ नोंदवून गिनेस बुकसाठी दावा केला होता. या इव्हेंटचे व्हिडीओ फुटेज, आवश्यक कागदपत्रे व पुरावे गिनेसच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते. सृष्टीच्या या पराक्रमाला नुकतीच गिनेस बुककडून हिरवी झेंडी मिळून प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती, सृष्टीचे वडील धर्मेंद्र शर्मा यांनी दिली. वेकोलि उमरेडचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले आणि अधिकारी अमितवा मैथी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात सृष्टीला गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सेंटर पॉइंट स्कूलची (वर्धमाननगर शाखा) विद्यार्थिनी असलेल्या सृष्टीने आतापर्यंत वेगवेगळ्या श्रेणीत सहा गिनेस रेकॉर्ड्स नोंदविले आहेत. लिंबो स्केटिंगमध्ये एवढे विश्वविक्रम नोंदवणारी सृष्टी ही जगातील पहिली महिला स्केटर आहे. सृष्टीची थोरली बहिण सिद्धीनेही स्केटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नाव कमावले आहे. सृष्टीने खेळ व शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. स्केटिंगच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ती भारतीयांना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा संदेश देत असते.

  • सृष्टीने सर्वप्रथम चीनच्या वी झ्यूचा ७.९७४ सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढून पहिल्यांदा गिनेस बुकमध्ये नाव नोंदविले होते.

  • त्यानंतर चीनच्या वू सवेलाही (७.९७४ सेकंद) तिने मागे टाकले होते. देशभरातील अनेक रोलर स्केटिंग व आईस स्केटिंग स्पर्धांमध्ये असंख्य पदके जिंकली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com