Vardha : विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vardha news

Vardha : विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

वर्धा : वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याने विद्यापीठाच्या परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. हे दूषित जेवण खाल्ल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाला. काही विद्यार्थ्यांना ओकाऱ्याही झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मध्यरात्री वासतिगृहाताच आंदोलन करीत भोजनालय चालविणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: Vardha : सावंगी रुग्णालयात शिबिरांचे आयोजन

विश्व विद्यापीठात गत दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत आहे. या संदर्भात येथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत माहिती दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे विद्यार्थी संतापून असताना शनिवारी रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्या. हे अन्न खाण्यात आल्याने तब्बल तेरा विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

प्रकृती अस्वस्थ झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहातच आंदोलन सुरू केले. रात्री नऊ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होते. प्रकृती अस्वस्थ झालेल्यांमध्ये पाच मुली आणि आठ मुलांचा समावेश आहे. मेसच्या जेवणाचे पैसे घेऊन देखील योग्य भोजन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला असल्याचे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा: Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

अन्न औषधी प्रशासनाची चमू दाखल झालेल्या या प्रकराची माहिती विद्यापीठ प्रशासनाने अन्न व औषधी प्रशासनाला दिली आहे. त्यांच्या चमूने या वसतिगृहात येत चौकशी करीत नमुने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या कडून या जेवणाचा चौकशी अहवालाची प्रतीक्षा विद्यापीठ प्रशासनाला आहे.

हेही वाचा: Nagpur : भाजपला मिळणार यश?

भोजनाचे कंत्राट असलेल्या व्यक्तीला या संदर्भात नोटीस बजावली आहे. शिवाय अन्न निरीक्षकांनाही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून नमुने घेण्यात येत आहेत. त्याचा अहवाल येताच या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात एकच विद्यार्थिनी रुग्णालयात गेली होती. तिला जेवणातून विषबाधा झाली नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

- रजनीश कुमार शुक्ल, कुलगुरू, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय, वर्धा