नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे सेवानिवृत्त, हे आहेत प्रभारी कुलगुरू

Murlidhar Chandekar
Murlidhar Chandekar

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रात्री 8.30 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा अतिरिक्त कुलगुरू प्रभार स्वीकारला. तीन दिवसांपूर्वी राज्यपाल कार्यालयातून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, हे विशेष. 

डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे 8 एप्रिल २०१५ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाले होते. आज ते निवृत्त झाल्यावर रात्री साडेआठ वाजता डॉ. काणे यांनी पदभार डॉ. चांदेकर यांना सोपविला. यावेळी कुलसचिव डॉ. निरज खटी व काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

देशात टाळेबंदी सुरू असतानाही डॉ. मुरलीधर चांदेकर यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याने विरोध होत असल्याचे समोर आले होते. सध्या टाळेबंदीमुळे विद्यापीठांसमोर परीक्षा आणि शैक्षणिक सत्र पूर्ण करण्याचा गंभीर प्रश्न असताना डॉ. चांदेकरांना दोन विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणे मोठे आवाहन असणार आहे. त्यातच जिल्हाबंदी असताना डॉ. चांदेकरांकडे नागपूर विद्यापीठाचा प्रभार कसा देण्यात आला? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com