विजय वडेट्टीवारांचे नागपूर पदवीधर निवडणुकीबाबत केलेले एक महिन्याआधीचे 'ते' भाकीत ठरले खरे   

Vijay vadettiwar already predicted winning of abhijit wanjari in nagpur
Vijay vadettiwar already predicted winning of abhijit wanjari in nagpur

नागपूर ः नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. या निवडणुकीला कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी संपूर्ण जोर लावला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अभिजित वंजारी १०१ टक्के विजयी होणार ते भाकीत गेल्या महिन्यातच केले होते. 

विधानपरिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातला थेट सामना  होता. कधी नव्हे ते कॉंग्रेसचे सर्व नेते एकजुटीने या निवडणुकीच्या प्रचारात लागलेले बघायला मिळाले. स्वतः अभिजित वंजारी यांनीही मतदारांघात मागील दीड वर्षांपासून काम करण्यास सुरुवात केली होती. 

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील गटबाजीचे विसर्जन झाले आणि सर्व नेते एकदिलाने आपल्या उमेदवारासाठी झटले. त्याचा निकाल आज समोर आहे. कॉंग्रेसचे नेते एक झाले तर विजय निश्‍चित आहे, याचा विश्‍वास मंत्री विजय वडेट्टीवारांना होता. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यातच या निवडणुकीचा निकाल सांगितला होता. 

मंत्री वडेट्टीवार आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी गेल्या महिन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चाच्या समारोपीय सभेत ओबीसी कार्यकर्ते मंचावर होते, तर आपल्या पदाची आणि प्रतिष्ठेची झूल उतरवून सर्व नेते खाली जनतेमध्ये बसले होते. 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि शहरातील नेत्यांचा समावेश होता. या मोर्चाने ओबीसी एकतेचा संदेश गेला. त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर पडल्याचे निकाल बघून जाणवते. महाविकास आघाडी किती भक्कम आहे, हे या निकालाने दाखवून दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com